शाहरूख सोबत झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ

अभिनेत्री शाहरूख (Shahrukh Khan) सोबत सिनेमात झळकली आहे. मात्र सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नाही आहे. त्यामुळे तिच्यावर सिनेमात अथवा मालिकेत काम मागण्याची वेळ आलीय. एका मुलाखतीत त्यांनी गोष्ट बोलून दाखवली आहे. 

Updated: Dec 3, 2022, 11:07 PM IST
शाहरूख सोबत झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ title=

बॉलिवूडच्या (Bollywood) झगमगत्या दुनियेत कधी कोणी रातोरात स्टार बनत, तर कधी कुणी स्टार बनलेला जमीनीवर देखील येतो. या संबंधित दाखले अनेक आहेत. अशाच आता एका प्रसिद्ध अभिनेत्री बाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री शाहरूख (Shahrukh Khan) सोबत सिनेमात झळकली आहे. मात्र सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नाही आहे. त्यामुळे तिच्यावर सिनेमात अथवा मालिकेत काम मागण्याची वेळ आलीय. एका मुलाखतीत त्यांनी गोष्ट बोलून दाखवली आहे. 

मी नीना गुप्ता नाही...

टीव्ही आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री डेलनाझ इराणी (Delnaaz Irani) बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. डेलनाझला काम करायचे नाही असे नाही. पण तिला कोणी कास्ट करत नाही. त्यामुळे तिच्याजवळ कोणते काम नाही आहे. त्यामुळे डेलनाझने मी नीना गुप्ता नाही, पण कोणी पाहिलं तर कदाचित तो मला काम देईल, असे तिने म्हटले आहे. 

हे ही वाचा : प्रसिद्ध Tik Tok स्टारचे निधन, चाहत्यांना बसला मोठा धक्का 

मुलाखतीत काय म्हणाली? 

अभिनेत्री डेलनाझ इराणीने (Delnaaz Irani) सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत. ती या मुलाखतीत म्हणते की, 'कल हो ना हो'मधून मला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर मी कोणत्याही एजन्सी किंवा मॅनेजरशी हातमिळवणी केली नाही. त्यावेळी दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी थेट संपर्क असायचा, असे ती म्हणाली.  

सतीश कौशिकने 'कल हो ना हो' पाहून मला फोन केला होता. पण आता कॉन्टॅक्ट नाही आहेत. कास्टिंग डायरेक्टर्स आल्यापासून स्ट्रगल जरा जास्तच झाला आहे. आता त्याच्या ऑफिसला जावं लागेल असं वाटतंय. आता खूप ग्रुपिझ्म आणि कॅंप झाले आहेत, असे डेलनाझचे (Delnaaz Irani) म्हणणे आहे.

'या' कारणामुळे काम मिळत नाही?

अभिनेत्री डेलनाझ इराणी (Delnaaz Irani) पुढे म्हणाली की, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरमुळे जुन्या कलाकारांच्या कामात फरक पडला आहे. माझ्या मित्रांनी मला सांगितले की, कास्टिंग डायरेक्टर त्यांना काम देत नाहीत कारण त्यांच्याकडे सोशल मीडियावर ब्लू टिक्स नाहीत. 

डेलनाझ (Delnaaz Irani) पुढे सांगते की, 30 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांपेक्षा सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. हे सर्व पाहून खूप वाईट वाटत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरची संख्याही वाढत आहे. यानंतर त्यांच्यासारख्या कलाकारांना कास्टिंग डायरेक्टर्समुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान डेलनाझही (Delnaaz Irani) 'कल हो ना हो' आणि 'रा.वन' सारख्या चित्रपटात दिसली आहे. याशिवाय तिने टीव्हीवर अनेक लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. मात्र सध्या तिला काम मिळत नाही. त्यामुळे तिच्यावर काम मागण्याची वेळ आली आहे.