त्रास आणि प्रचंड वेदना...; CID फेम दयाला नेमकं काय झालंय?

सध्या स्ट्रॉंग आणि पॉवरफुल दया प्रचंड वेदना सहन करतोय. स्वतः दयाने याबाबत माहिती दिली आहे.

Updated: Dec 3, 2022, 10:40 PM IST
त्रास आणि प्रचंड वेदना...; CID फेम दयाला नेमकं काय झालंय? title=

Dayanand Shetty News: दया दरवाजा तोड दो... हे डायलॉग कोणाला माहिती नसेल असं शक्य नाही. सीआयडी फेम दया म्हणजे दयानंद शेट्टीसाठी (Dayanand Shetty) वापरला जाणारा हा डायलॉग आहे. आता हाच दया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यंदा तो चर्चेत येण्याचं कारण फार वेगळं आहे. सध्या स्ट्रॉंग आणि पॉवरफुल दया प्रचंड वेदना सहन करतोय. स्वतः दयाने याबाबत माहिती दिली आहे.

दयानंद शेट्ट्या डोक्यावरील केस विरळ झाले. यामुळे तो फार चिंतीत होता. एखाद्या एक्टरच्या डोक्यावर केस नसतील तर ती फार चिंतेची बाब आहे. कारण त्यांच्यासाठी लूक हा फार महत्त्वाचा मानला जातो. यासाठीच दयानंदने हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) केला आहे. त्याने त्याच्या इस्टाग्रामवरून (Instagram) एक व्हिडीओ शेअर करत याबाबतचा अनुभव देखील सांगितला आहे.

दयाने शेअर केला त्याचा अनुभव 

या व्हिडीयोमध्ये दयाने सांगितलंय की, लोकं सांगतात या प्रक्रियेमध्ये खूप वेदना होतात आणि सूज देखील येते. मात्र मला सूज येण्याची समस्या जाणवली नाही. हा मात्र डोळ्यांच्या जवळ तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सूज आली होती. शिवाय वेदनाही झाल्या. मात्र 20-21 दिवसांत या वेदना कमी झाल्या. 

तो पुढे म्हणतो, "ज्या ठिकाणी हेयर ट्रांसप्लांटची प्रक्रिया सुरु असते, तिथे चुकून जरी कशाचा स्पर्श झाला तर प्रचंड वेदना होऊ लागतात." याशिवाय तो त्याचा पुढचा अनुभव देखील शेअर करणार असल्याचं दयाने सांगितलंय.

सिंघम रिटर्न्समध्ये दयाची खास भूमिका 

सीआयडीमधील इन्स्पेक्टर दया या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली. त्याचं हे अवघ्या काही वेळातच आयकॉनिक बनलं. त्यानंतर त्याने चित्रपटांमध्येही काम केलं. दयानंदने अजय देवगणसोबत सिंघम रिटर्न्समध्ये काम केलं. या चित्रपटातही त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. याशिवाय तो 'खतरों के खिलाडी' रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.