अनेक वर्षांपूर्वी 'या' दिवशी केला होता दीपवीरने साखरपुडा

या दिवशी केला साखरपुडा 

अनेक वर्षांपूर्वी 'या' दिवशी केला होता दीपवीरने साखरपुडा  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण 14-15 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. इटलीतील लेक कोमो येथे या दोघांनी सुरूवातीला कोंकणी आणि नंतर सिंधी पद्धतीने विवाह बंधनात अडकले. 

भारतात आल्यानंतर या दोघांनी तीन रिसेप्शन आयोजित केले होते. ज्यातील पहिलं रिसेप्शन दीपिकाच्या माहेरी म्हणजे बंगलुरूला झालं. त्यानंतरचे 2 मुंबईत पार पडली. 

दीपवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. याचं प्रमुख कारण म्हणजे या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना मोबाइल फोन वापरण्यास सक्त मनाई होती. 

पूर्ण पारंपरिक पद्धतीने दोन्ही लग्न झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरने स्वतः आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंची चाहते मनापासून वाट पाहत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आता अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे दीपवीरच्या चाहत्यांना विश्वास बसणार नाही. दीपिका आणि रणवीरच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका आणि रणवीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनानंतरच या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

पण तुम्हाला हे वाचून हैराण होईल की या दोघांचा साखरपुडा खूप अगोदरच झाला होता. 2016 मध्ये या संबंधीत एक बातमी समोर आली होती. डिसेंबर 2015 मध्ये या दोघांचा बाजीराव मस्तानी हा सिनेमा आला होता. 

या दोघांनी साखरपुड्याच्या बातमीला स्विकारलं देखील नव्हतं आणि नाकारलं देखील नव्हतं. पण अद्याप या दोघांनी कधी साखरपुडा केला याची काहीच माहिती समोर आलेली नाही.