'तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही'... पीरियड्सवर मोकळेपणाने बोलली दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण हिने आता महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जागरुकता वाढवण्याचं काम हाती घेतलं आहे. 

Updated: May 28, 2022, 09:45 PM IST
'तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही'... पीरियड्सवर मोकळेपणाने बोलली दीपिका पदुकोण title=

मुंबई : डिप्रेशनसारख्या गंभीर समस्येवर मोकळेपणाने बोलणारी बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आता महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जागरुकता वाढवण्याचं काम हाती घेतलं आहे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाआधी, बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत एक व्हिडिओ 'पीरियड स्टोरी'वर शेअर केला आहे.

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75 व्या आवृत्तीच्या ज्युरी सदस्य असलेल्या दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून आणि इतरांकडून खूप कौतुक मिळत आहे. जनजागृती करणारा 'पीरियड स्टोरी व्हिडिओ' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये, दीपिका तिच्या शाळेत मासिक पाळी सुरू होण्याआधीच्या कालावधीबद्दल शिक्षित झाल्याची तिच्या बालपणीची कथा सांगताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री म्हणते, ''माझी सर्वात चांगली मैत्रीण, मी आणि तिच्या आईसोबत बसलो आणि तिच्या आईने आम्हाला पीरियड्स बद्दल सांगितलं, 'पीरियड्स म्हणजे काय'? 'असं का होतं'.  ते क्षण मी कधीही विसरू शकत नाही.  'पीरियड स्टोरी' हा फेम-टेक ब्रँड Nua चा खास व्हिडिओ आहे.

एका वृत्तानुसार, Nua चे संस्थापक आणि CEO रवी रामचंद्रन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, ''असे संभाषण सांगा जे शांत आवाजास पात्र नाही. मुलांसाठी, मग ते मुली असोत की मुलं, पालकांनी त्यांच्याशी लवकरात लवकर आणि हळू संभाषण सुरू केलं पाहिजे जेणेकरुन त्यांना तारुण्य येण्यापूर्वी समजून घेता येईल.

हे देखील आवश्यक आहे की, जेव्हा तुम्ही या विषयावर त्यांचं ज्ञान वाढवता, तेव्हा तुम्ही त्यांना अत्यंत सोईने आणि संयमाने मार्गदर्शन करता जेणेकरून ते कधीही अस्वस्थ विषय म्हणून घेऊ नयेत.'