मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमाची चर्चा वेगवेगळ्या कारणाने सतत रंगलेली असते. आधी या सिनेमाचा सेट जाळल्याचं प्रकरण खूप गाजलं. त्यासोबतच या सिनेमातील तिन्ही कलाकारांचे लूक्सही चर्चेचा विषय ठरत आहेत.
आता या सिनेमासाठी कलाकारांनी घेतललं मानधन चर्चेत आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी दीपिका पादुकोनने रणवीर सिंह आणि शाहिद कपूरपेक्षाही जास्त मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.
‘पद्मावती’ या ऎतिहासिकपटात दीपिका पादुकोन, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमासाठी दीपिकाला १३ कोटी रुपये मिळाले असल्याचे बोलले जात आहे. तर रणवीर सिंह आणि शाहिद कपूरने प्रत्येकी १० कोटी रुपये घेतले आहेत. हा बहुचर्चीत सिनेमा १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
१५० कोटी रुपयांचं बजेट असलेला हा सिनेमा महाराणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. दीपिका पादूकोण पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजी आणि शाहिद कपूर राजा रतन सिंहच्या भूमिकेत दिसेल. तसेच अदिती राव हैदरीही दिसेल.