'जुडवा २' चे दुसरे गाणे प्रदर्शित...

काही दिवसांपूर्वीच वरुण धवनच्या आगामी चित्रपटाचा म्हणजे 'जुड़वा-2' ट्रेलर रिलीज झाला आणि आता चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 31, 2017, 02:34 PM IST
'जुडवा २' चे दुसरे गाणे प्रदर्शित...  title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच वरुण धवनच्या आगामी चित्रपटाचा म्हणजे 'जुड़वा-2' चा ट्रेलर रिलीज झाला आणि आता चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

चित्रपटाचा ट्रेलर खूपच इंटरटेनिंग असून चित्रपटामधील 'चलती है क्या 9 से 12' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गाण्याचा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. आता चित्रपटातील नवीन गाणे  'सुनो गणपति बप्पा मोरया' हे रिलीज झाले आहे. यात वरुण धवनने आपल्या नृत्याने बहार आणली आहे. 

चित्रपटात वरुणचा डबल रोल आहे. त्यात एका व्यक्तिरेखेचे नाव 'राजा' तर दुसऱ्या व्यक्तिरेखेचे नाव 'प्रेम' आहे. पहिले गाणे हे दोघांवर चित्रित झाले असून दुसऱ्या गाण्यात फक्त 'राजा' च दिसत आहे. 'सुनो गणपति बप्पा मोरया, परेशान करें मुझे छोरियां' काहीशा अशाप्रकारचे गाण्याचे बोल आहेत. अमित मिश्राने हे गाणे गायले असून या गाण्याची उडती चाल प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

या चित्रपटात वरूण ऐवजी जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या अभिनेत्री आहेत. १९१७ मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'जुड़वा' या चित्रपटाचा हा सिक्वल असून हा चित्रपट २९ सप्टेंबरला रिलीज होईल.