‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अजयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आहे.

Updated: Apr 2, 2019, 06:18 PM IST
‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने ५० व्या वर्षी पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच २ लाख चाहत्यांनी पाहिला आहे. ट्रेलरमध्ये अजय त्याच्या मुलीच्या वयाच्या तरूणीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटात अजय ५० वर्षाचा दाखवण्यात आला आहे आणि तो २४ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. या दोघांमध्ये तब्बल २६ वर्षांचा फरक आहे. चित्रपटात अजय तब्बू आणि रकुल प्रित मुख्य भूमिका साकारकाना दिसणार आहे. 

‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेमाला कोणत्याही प्रकारच्या सिमा नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हे प्रेम अजयच्या कुटुंबाला मान्य नसल्याचे दिसत आहे. चित्रपटात विनोदी हावभाव दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात तब्बू अजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आकिब अली यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेचे लेखण लव रंजन यांनी केले आहे. ‘दे दे प्यार दे’चित्रपट १७ मेच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.  

महत्वाची बाब म्हणजे चित्रपटात संस्कारी बाबू आलोक नाथ यांची सुद्धा वर्णी लागणार आहे. गत वर्षी आलोक नाथ मी टूच्या वादळात अडकले होते. निर्माती विनता नंदा यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला होता. 

अजयच्या 'केसरी' चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर सुद्धा चित्रपटाने चांगलीच मजल मारली. यानंतर अजय ‘दे दे प्यार दे’चित्रपटाच्या व्यतिरिक्त ‘RRR’, ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’, ‘तुर्रम खान’, ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.