डान्सिंग अंकलचं 'या' दिग्गज अभिनेत्यांना चॅलेंज

या दोन अभिनेत्यांना दिलं चॅलेंज 

डान्सिंग अंकलचं 'या' दिग्गज अभिनेत्यांना चॅलेंज  title=

मुंबई : सोशल मीडियावर एका रात्रीतच लोकप्रिय झालेले डान्सिंग अंकल जन सामान्यांमध्येच नाही तर बॉलिवूडकरांमध्येही लोकप्रिय झाले आहेत. डासिंग अंकल आपल्या व्हिडिओमुळे स्टार बनले आहेत. सगळीकडे याच डासिंग अंकलची चर्चा आहे.  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील डब्बू अंकलचे फॅन झाले असून त्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. डासिंग अंकलचं नाव संजीव श्रीवास्तव असून मध्य प्रदेशच्या विदिशा येथे राहणारे आहेत. हे डान्सर अंकल प्रोफेसर असून आता महाविद्यालयातही यांची चर्चा आहे. 

या डान्सिंग अंकलने चक्क 2 बॉलिवूड अभिनेत्यांना चॅलेंज दिलं आहे. यामध्ये त्याने दबंग सलमान खान आणि गोविंदाला चॅलेंज दिलं आहे. सोनी दे नखरे सोणे लगते... असं म्हणतं त्यांनी सलमान आणि गोविंदाला चॅलेंज दिलं आहे. आता हे चॅलेंज हे दिग्गज अभिनेते स्वीकारतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

बॉलिवूडमध्ये रवीना टंडन, अर्जून कपूर, दिव्या दत्ता आणि गोविंदासारखेच अनेक कलाकार या डासिंग अंकलचे फॅन झाले आहेत. एवढंच काय बॉलिूडचा स्टार सुनील शेट्टी याने या प्रोफेसरची स्वतः बोलवून मुंबईत भेट घेतली आहे. रविवारी संध्याकाळी सुनील शेट्टीने संजीव श्रीवास्तव यांची भेट घेतली. याबाबत प्रोफेसर डासिंग अंकलने ट्विट केलं आहे. 

सोशल मीडियावर लोकप्रिय होताच प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांनी ट्विटरवर आपलं अकाऊंट सुरू केलं आहे. आतापर्यंत 16 हजार लोकांनी अंकलजींना फॉलो केलं आहे. या अकाऊंटला त्यांनी आता डान्सचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पार्टनरच्या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून संजीव यांनी गोविंदा आणि सलमान खानला चॅलेंज देखील दिलं आहे. त्यामुळे आता डासिंग अंकलच हे चॅलेंज हे कलाकार स्वीकारतात का हेच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.