मुंबई : तब्बल 62 दिवसांनंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला राज कुंद्राला मंगळवारी जामीन मंजूर झाली. पोर्नोग्राफी बनवण्याच्या आणि वितरणाच्या आरोपाखाली दोन महिने कारागृहात ठेवले होते. मुंबईच्या सेशन कोर्टाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राज कुंद्रा आणि सहकर्मचारी रायन थोरपे यांना जामीन मंजूर झाला. पण या दोघांना फक्त 50 हजारांच्या जातमुचलक्यावरच नाही तर काही अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना जामीन मंजूर केला. मात्र त्यासोबत काही अटी घालण्यात आल्या. यामध्ये त्यांनी अश्लील फिल्म प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांनी या दोघांची वक्तव्य रेकॉर्ड केली. तसेच वियान इंडस्ट्रीतील सर्व मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. या पुराव्यांशी कोणतीही छेडछाड न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
या व्यतिरिक्त कोर्टाने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींना जामीन मिळाला आहे. पुढील तपास सुरू असल्याने त्यामुळे निकाल लागेपर्यंत आरोपींना तुरुंगात ठेवता येत नाही. या आधारावर, मुंबईच्या सत्र न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन थोरपे यांना जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांची मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली.
'मला शिल्पा शेट्टीची चिंता नाही... ती स्वतःची काळजी घेईल. मला त्यांच्या अल्पवयीन मुलांची जास्त काळजी आहे. शेट्टी आणि त्यांच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावरील मीडिया रिपोर्ट चिंतेचा विषय आहे ... या प्रकरणाचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.' असं न्यायाधीश पटेल म्हणाले.