श्रद्धा कपूरची 'या' बॉलिवूड अभिनेत्यासाठी खास पोस्ट,फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

Updated: Jul 7, 2022, 06:35 PM IST
श्रद्धा कपूरची 'या' बॉलिवूड अभिनेत्यासाठी खास पोस्ट,फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  title=

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियवार व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. नुकतीच तिने कु अॅपवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने सिद्धांत कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पोस्टमध्ये काय? 
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त श्रद्धाने कु अॅपवर भाऊ सिद्धांत कपूर सोबत फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्य़ा खास शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोलो कॅप्शनला ती लिहते, घरवापसी आणि भावाचा वाढदिवस या दोघांना मिळून हॅप्पीनेस तयार होते. म्हणजेच या दोन्ही गोष्टी तिच्यासाठी आनंदाचे क्षण असल्याचे तिचे म्हणणे आहे.  

सिद्धांत कपूर नुकताच आपला 38वा वाढदिवस साजरा केला. सिद्धांत हा बॉलीवुडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ति कपूर यांचा मुलगा आहे. सिद्धांतने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे सिनेमे बॉलिवूडमध्ये तुफान गाजले देखील.