Sukesh Chandrashekhar letter to jacqueline fernanadez : असं म्हणतात की प्रेम व्यक्त करण्यासाठी निमित्त लागत नाही. बऱ्याचदा ही भावना व्यक्त करण्यासाठी योग्य जागा कोणती याचाही विचार केला जात नाही. कारण, प्रेम म्हणजे प्रेम असतं. सेलिब्रिटी, नेतेच काय... इतर सगळ्यांसाठी ही भावना वेगळी नाही. सध्या एक असंच प्रेमपत्र समोर आलं आहे. पण, त्याची इतकी चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे ते पत्र लिहिलंय कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखर यानं.
(Sukesh Chandrashekhar) सुकेशच्या नावानं लगेचच लक्षात येतं ते म्हणजे तब्बल 200 कोटी रुपयांच्या अफरातफरीचं प्रकरणि अभनेत्री जॅकलिन फर्नांडिजसोबतचं त्याचं कथित नातं. ही तिच (jacqueline fernanadez) जॅकलिन आहे, जिच्यासोबतचे त्याचे काही Private Photos व्हायरल झाले होते. यावेळी सुकेशनं तिच्यासाठी मंडोली कारागृहातून पत्र लिहित तिला होळीच्या शुभेच्छा दिल्या. (Sukesh Chandrashekhar letter to jacqueline fernanadez)
ती एक उत्तम व्यक्ती असून, तिच्या बेरंग आयुष्यात पुन्हा रंगांची उधळण करण्याचं वचनही त्यानं पत्रातून दिलं.
'रंगांची उधळण केल्या जाणाऱ्या या सणाच्या वेळी मी तुला वचन देतो की, तुझ्या बेरंग आयुष्यात मी पुन्हा रंगांची उधळण करेन. मी याची खात्री देतो की ही माझीच जबाबदारी असेल. तुलाही माहितीये मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गं', असं त्यानं पत्रात किलिलं. My Princess असं लिहित त्यानं जॅकलिनला तू कायम हसत राहा, असा संदेशही दिला.
कोट्यवधी रुपयांची अफरातफर प्रकरणी सुकेश कारागृहात असतानाच जॅकलिनचीही ईडी चौकशी करण्यात आली होती. त्यानं फक्त जॅकलिनच नव्हे नोरा फतेहीलाही महागड्या भेटवस्तू दिल्याची बाब समोर आली होती. ईडीच्या माहितीनुसार सुकेशनं जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांसाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले होते. जॅकलिननं मात्र या नात्याच्या बाबतीत नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.