एस्ट्रोनॉट राकेश शर्मा यांच्यावर बायोपिक,हा अभिनेता साकारणार भूमिका

कोण साकारणार भूमिका 

एस्ट्रोनॉट राकेश शर्मा यांच्यावर बायोपिक,हा अभिनेता साकारणार भूमिका  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची डिमांड पाहता बॉलिवूडने आता बायोपिकवर विशेष काम करताना दिसत आहे.  एस्ट्रोनॉट राकेश शर्मा यांच्या बोयपिक खान तयार होत आहे. या सिनेमात बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राकेश शर्माची भूमिका साकारत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती मिळत आहे की, बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरूख खान राकेश शर्मा यांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची कथी अंजुम राजाबली यांनी लिहिली असून याचं दिग्दर्शन महेश मथाई यांनी केलं आहे. सिनेमाची निर्मिती सिद्धार्थ राय कपूर आणि स्क्रूवाला के राय कपूर फिल्म आणि आरएसवीपी फिल्मच्या बॅनर अंतर्गत केली जाणार आहे. 

शाहरूख खानच्या अपोझिट रोलमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर असण्याची अपेक्षा आहे. अद्याप या सिनेमाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

रोनी स्क्रूवाला यांनी सांगितलं की, शाहरूख खानसोबत हा सिनेमा करत आहेत. या सिनेमाची शुटिंग पुढच्यावर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरू होणार आहे. आतापर्यंत अभिनेत्रीची घोषणा करण्यात आलेली नाही.