मुंबई : मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक हा सिनेमा २०२० साली प्रदर्शित झाला. एका गंभीर विषयावर बनवला गेलेला हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. दिपीका पदुकोण स्टारर या सिनेमातून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. हा सिनेमा एका अॅटक सर्वाइवर आधारित होता. या सिनेमातून एक सोशल मॅसेज देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रेक्षक हा सिनेमा पाहून चांगलेच नारज झाल्याचं आपण पाहिलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारसा चालला नाही. या सिनेमाच्या मेकर्सला सगळीकडून नुकसान झालं होतं. हा सिनेमा रिलीज होवून ३ वर्ष झाली आहेत. मात्र ३ वर्षानंतर या सिनेमाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
हा सिनेमा फ्लॉप होण्यामागचं कारण दीपिका पदुकोण असल्याचं दिग्दर्शिकेचं म्हणणं आहे. एका मुलाखतीत मेघना यांनी छपाकच्या अपयशावर मोठं वक्तव्य करत सांगितलं आहे की, त्यावेळी दीपिकाचं जवाहर लाल नेहरु JNU जाणं सिनेमासाठी ठिक नव्हतं. कारण याचा सगळा परिणाम सिनेमावर झाला आणि ज्या विषयावर सिनेमा बनवला गेला होता तो विषयच बाजूला राहिला आणि कोणता तरी नवीनच मुद्दा उपस्थित केला गेला.
2020 मध्ये जेएनयूमध्ये विद्यार्थी धरणे आंदोलन करत होते. या आंदोलनावरुन संपूर्ण देशभरात चर्चा रंगली होती. दीपिकाने रात्री अचानक या आंदोलनाला हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हजेरी लावत तिने आंदोलनाला समर्थन दिलं होतं. यानंतर हा वाद अजून पेटला. हा वाद इतका पेटला की दीपिकाचा सिनेमा छपाकला बॉयकॉट करण्याची मागणी होवू लागली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र या सिनेमाच्या फ्लॉपला दीपिका पदुकोण कारणीभूत असल्याचं दिग्दर्शक मेघना गुलजार यांचं म्हणणं आहे. हा सिनेमा रिलीज होवून ३ वर्ष झाली आहेत.
सध्या मेघना गुलजार तिचा आगामी सिनेमा सॅम बहादूरमळे चर्चेत आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये या सिनेमाची टीम व्यस्त आहे. या सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. १ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्वात दमदार भूमिकेपैकी ही एक भूमिका असल्याचं विकी म्हणाला आहे. या सिनेमासाठी तो खूप एक्साईटेड असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यानंतर त्याचा अभिनयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. त्याचे चाहते गेले अनेक दिवस त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते.