पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्सने भविष्याबाबत घेतला मोठा निर्णय

जगप्रसिद्ध पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्सने आपल्या भविष्याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 18, 2017, 06:57 PM IST
पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्सने भविष्याबाबत घेतला मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्सने आपल्या भविष्याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ब्रिटनी स्पियर्सने मृत्यू पत्रात बदल करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. टीएमजेड डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनी स्पिअर्सने आपली सीन (११) आणि जेडन (१०) यांचा जन्म होण्याआधी मृत्युपत्र बनवलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की, मुलं १८ वर्षांची झाल्यानंतर माझी संपत्ती त्यांना मिळेल. 

मात्र, आता ब्रिटनी स्पिअर्स आपल्या मृत्यू पत्रात बदल करण्याच्या विचारात आहे. कमी वयात मुलांवर मोठी जबाबदारी येणार असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनी स्पिअर्स आपल्या मुलांसाठी एक ट्रस्ट बनवत आहे. आपली दोन्ही मुलं १८ वर्षांचे झाल्यानंतर स्पिअर्स त्यांच्या नावावर एक ठराविक रक्कम देईल. त्यानंतर २५ वय झाल्यावर इतर रक्कम देईल.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेले रेमंड लिमिटेड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांच्या परिवारातील वाद काही दिवसांपूर्वीच समोर आला. विजयपत सिंघानिया यांच्यावर आलेली वेळ पाहूनच कदाचित जगप्रसिद्ध पॉप गायिका ब्रिटनी स्पिअर्स हिने आपला निर्णय बदलल्याचं दिसत आहे.