मुंबई : कपिल शर्माने गेल्या काही दिवसात अनेकदा शूटींग रद्द केली आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक टीका झाल्या. परंतू, कपिलच्या आजारपणाचे कारण पुढे करण्यात आले. आता पुन्हा एकदा त्याची अमिताभ बच्चन सोबत असलेली शूटिंग रद्द झाली आहे. ही शूटींग अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शो ची होती. पण यंदा शूटींग रद्द होण्याचे कपिल नसून दुसरेच काहीतरी आहे.
कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनसाठी अमिताभ बच्चन आणि कपिल शर्मा यांना एकत्रित सेगमेंट शूट करायचे होते. परंतू, ही शूटींग सुरु होण्यापूर्वीच रद्द झाली. याला जबाबदार कपिल नसून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आहेत.
चित्रपटसृष्टीतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचे काम अधिकतर ठप्प झाले आहे. केबीसीच्या क्रू मेंबर्स पैकी मेकअप आर्टिस्ट, लाईट मॅन, स्पॉटबॉय संपावर आहे. त्यामुळे शूटींग शक्य होणार नाही. त्यामुळे कपिल आणि अमिताभचे शूटींग देखील रद्द करण्यात आले. यापूर्वी देखील संपामुळे शाहरुख खान आणि अनिल कपूर सोबत असलेले केबीसीचे शूटींग रद्द करण्यात आले होते.