'ब्रह्मास्त्र'वर बहिष्कार, करण जोहर चिंतेत; पोस्ट शेअर करत म्हणाला...

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटातून जात आहे.

Updated: Aug 15, 2022, 11:57 PM IST
'ब्रह्मास्त्र'वर बहिष्कार, करण जोहर चिंतेत; पोस्ट शेअर करत म्हणाला... title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटातून जात आहे. अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे प्रकार सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. लाल सिंह चड्ढा आणि पठाणनंतर आता ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तेव्हापासून चित्रपटाचा निर्माता करण जोहरला काळजी वाटू लागली आहे. ही चिंता त्याने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

15 ऑगस्ट रोजी करण जोहरने ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासाठी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये करण जोहरने ब्रह्मास्त्र चित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अयान मुखर्जीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, 'प्रेम ही खूप मजबूत भावना आणि  इमोशनआहे.

ज्याचे तुकडे केले, तरीही खूप जाणवतं. मी तुझ्यावर प्रेम करतो अयान आणि मी तुझ्यासोबत तेवढंच प्रोटेक्टिव्ह फिल करतो जेवढं माझ्या दोन जुळ्या मुलांसाठी मला वाटतं. मला माहित आहे की, तू तुझ्या ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी एक दशक वाहिलं आहेस. मी तुमच्या इतकं प्रोफेशनल लाईफसाठी समर्पित होताना कोणाला पाहिलं नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण जोहरने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, 'उद्या किंवा 9 सप्टेंबरला काय होणार आहे हे सध्या आम्ही सांगू शकत नाही, परंतु तुमची वचनबद्धता आणि मेहनत आधीच जिंकली आहे. तुम्ही फक्त उडता, हवेत उंच उडता, उच्च ध्येय ठेवा आणि ते साध्य करा. स्वप्ने तेव्हाच सत्यात उतरतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर खरोखर विश्वास ठेवता आणि मला माहित आहे की, तु तेच करतो. तुझं स्वप्न तुझ्या मेहनतीचं प्रेम आहे, हे लवकरच या जगाला दिसेल. लव यू मेरे बच्चे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा.'