राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर; शुद्धीवर येण्यासाठी लागू शकतात एवढे दिवस

 जस-जसे दिवस जात आहेत. तसतसे चाहत्यांना राजू श्रीवास्तव यांची चिंता वाढू लागली आहे.

Updated: Aug 15, 2022, 11:29 PM IST
राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर; शुद्धीवर येण्यासाठी लागू शकतात एवढे दिवस  title=

मुंबई : जस-जसे दिवस जात आहेत. तसतसे चाहत्यांना राजू श्रीवास्तव यांची चिंता वाढू लागली आहे. कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचं पथक अभिनेत्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे. चाहत्यांच्या चिंतेमध्ये या नवीन अपडेटमुळे त्याच्या चाहत्यांना नक्कीच थोडा दिलासा मिळू शकतो.

शरीरात घातला नवीन स्टेंट 
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करून ५ दिवस झाले आहेत. पण अद्याप तो शुद्धीवर आलेला नाही. पण कॉमेडियनच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यावर आता कलाकारही आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी, त्याच्यामध्ये नवीन स्टेंट टाकण्यात आल्याचंही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

10 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल
१४ ऑगस्टला राजू श्रीवास्तवचा एमआरआय रिपोर्ट आला. या अहवालानुसार, डॉक्टरांनी सांगितलं होतं की अभिनेत्याच्या मेंदूच्या एका भागात एक जखम आहे. ती बरे करण्यासाठी वैद्यकीय गोष्टींचा वापर केला जाईल. ज्याला बरे होण्यासाठी सुमारे 10 दिवस लागतील आणि त्याला शुद्धीवर परत येण्यासाठीही तेवढाच वेळ लागू शकतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजू श्रीवास्तव हा आधीच हार्ट पेशंट होते. बातम्यांनुसार, अभिनेत्यासाठी 9 स्टेंट आधीच घालण्यात आले आहेत. राजू श्रीवास्तव यांनी यापूर्वी दोनदा अँजिओप्लास्टी केली आहे. यावेळी तिसऱ्यांदा ही अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.