श्रीदेवींचा फोटो पोस्ट करत बोनी कपूर भावूक, म्हणाले... 

बोनी कपूर यांनी मंगळवारी श्रीदेवी यांचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना भावूक केलंय.

Updated: Jan 19, 2022, 02:54 PM IST
श्रीदेवींचा फोटो पोस्ट करत बोनी कपूर भावूक, म्हणाले...  title=

मुंबई : बोनी कपूर यांनी मंगळवारी श्रीदेवी यांचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना भावूक केलंय. बोनी यांनी श्रीदेवी यांचा २०१२ चा फोटो शेअर केला आहे. यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला रूपाची राणी तर काहींनी चांदनी असं म्हटलं आहे. त्याचबरोबर, श्रीदेवी यांच्या पाठीवर सिंदूर लावून बोनी कपूर यांचं नाव कोणी लिहिलं आहे हे जाणून घेण्याचा अनेक लोकं प्रयत्न करत आहेत. हे फोटो लखनौचे आहेत. फोटोवर श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. श्रीदेवी यांच्या मुलगी खुशी आणि जान्हवी देखील अनेकदा त्यांच्या आईचे फोटो पोस्ट करतात.

बोनी कपूर यांनी त्यांची दिवंगत पत्नी श्रीदेवी यांचा जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये लिहिलं आहे, 2012 मध्ये लखनऊच्या सहारा सिटीमध्ये दुर्गा पूजा साजरी करत होतो. हा फोटो सिंदूरखेलाचा आहे, ज्यामध्ये श्रीदेवी स्माईल देताना दिसत आहे. त्यांच्या गालावर आणि डेक्यावर सिंदूर  लावल्याचं आहे, तसंच बोनी कपूर यांचं नाव पाठीवर सिंदूरने लिहिलेलं आहे.

फॅन्स इमोशनल
श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी या फोटोवर भावनिक कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलंय, पण साहेब, तिथे तुमचं नाव कुणी लिहिलंय. आणखी एक कमेंट आहे, त्या आता नाही यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मेहंदीमध्ये देखील दिसलं  बोनी यांचं नाव
श्रीदेवी यांच्या आयुष्यात त्यांचं कुटुंब हेच त्यांचं प्राधान्य होतं. त्यांच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर त्यात फक्त बोनी, जान्हवी आणि खुशीचे फोटो आपल्याला पहायला मिळतील. एका फोटोमध्ये श्रीदेवी यांच्या मेहंदीमध्ये देखील तिच्या मुली आणि पतींची नावे देखील दिसू शकतात.