मुंबई : अभिनेत्री यामी गौतम, जिने एकेकाळी तिची स्किन ब्राईटनिंगचा दावा करणाऱ्या कॉस्मेटिक उत्पादनांचं समर्थन केलं होतं. आता तिने तिच्या स्किनबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे की, तिला एक असाध्य स्किन रोग आहे, जो फोटोंमध्ये दिसतो.
मंगळवारी यामीने तिच्या फोटोशूटमधील पाच फोटो पोस्ट केले, ज्यात ती वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे. यापैकी काही क्लोज-अप देखील आहेत. या फोटोंसोबत यामीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हॅलो माय इन्स्टा फॅमिली, अलीकडेच मी काही फोटोंशूट केलं आणि जेव्हा ती माझ्या स्किनची स्थिती केराटोसिस-पिलेरिस लपवण्यासाठी पोस्ट प्रॉडक्शनमध्ये जाणार होती. जी एक सामान्य प्रक्रिया आहे. तेव्हा मी स्वतःला म्हणाले, यामी, तू हे सत्य का स्वीकारत नाहीस?
होय, मी स्वतःशी मोठ्याने बोलते. त्या लोकांसाठी, ज्यांना याची जाणीव नाही, ही स्किनची स्थिती आहे ज्यात चेहऱ्यावर लहान मुरुम दिसतात. मी तुम्हाला खात्री करुन देते की, ते तुमचा मेंदू आणि तुमच्या शेजारच्या काकूंनी बनवल्याप्रमाणे वाईट नाहीत. मला तरुणपणातही ही स्किनची समस्या होती आणि त्यावर कोणताही इलाज नाही. मी ते बरीच वर्षे सहन करत आले आणि आता शेवटी मी माझी भीती आणि असुरक्षितता बाजूला ठेवून आणि माझ्या कमतरता मनापासून स्वीकारून ते स्वीकारण्याचं धैर्य वाढवलं. माझं हे सत्य तुमच्यासोबत शेअर करण्याची हिंमतही मी केली आहे.
यामी गौतमची ही पोस्ट अनेकांना आवडली आहे. या वर्षी तिने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केलं. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या भूत पोलिस या हॉरर-कॉमेडी चित्रपटात यामी मुख्य भूमिकेत दिसली होती.