सर्वांसमोरच शाहरुखने जुहीला टोकलं; पण, आज तिच ठरली तारणहार

आर्यनच्या जामीनावेळी जुही महत्त्वाच्या भूमिकेत...   

Updated: Nov 1, 2021, 12:20 PM IST
सर्वांसमोरच शाहरुखने जुहीला टोकलं; पण, आज तिच ठरली तारणहार title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये कट्टर मित्र म्हणवल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या जोड्यांमध्ये अनेक नावं घेतली जातात. या नावांमध्ये सलमान खान आणि शाहरुख खानच्याही नावाचा उल्लेख केला जातो. पण, शाहरुखच्या सध्याच्या अडचणीच्या घडीला त्याच्चयासाठी तारणहार ठरलं त्याचं मैत्रीचं खास नातं. 

हे खास नातं आहे जुही चावला आणि शाहरुखच्या मैत्रीचं. किंग खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी जामीन मिळाला त्यानंतर जुही चावलाच तिथं जामीनदार म्हणून हजर होती. 

हमीदार म्हणून जुहीनं तिथे बाँड भरला आणि पुन्हा एकदा या सेलिब्रिटींचं मैत्रीचं नातं किती घट्ट आहे हे सिद्ध झालं. 

शाहरुख आणि जुही चावला यांची मैत्री शब्दांत न मांडता येणारी आहे. तिची खिल्ली उडवायची संधी तो कधीच सोडत नाही. सोबतच ती कुठे चुकली तर त्यावेळी तिला दरडावण्याचं कामही तो करतो. 

एका मुलाखतीत जुहीनंच याबाबतचा खुलासा केला होता. सलग काही चित्रपटांतून झळकल्यानंतर आपल्यामध्ये अहंकार वाढला होता असं तिनं सांगितलं. आपण म्हणजे सगळ्यात अग्रेसर, असंच तिला वाटत होतं. 

जुहीच्या याच सवयीमुळे एकदा आईसोबत तिचा वाद झाला. ज्यानंतर सर्वांसमोरच ती चुकली हे लक्षात घेत तू कायमच आई- वडिलांशी चांगलं वागत जा, अशी कानउघडणी त्यानं केली. शाहरुखनं हे सारं जुहीला अगदी हक्कानं सांगितलं होतं. 

सुखदु:खात एकमेकांसोबत उभं राहण्यासोबतच मित्र कुठं चुकीच्या मार्गावर गेल्यास त्याला हक्कानं मागे आणण्याचं कर्तव्य बजावणं म्हणजेच खरी मैत्री... नाही का?