Ekta Kapoor: बॉलीवूडच्या ट्रेण्डमुळे सध्या सेलिब्रेटींची झोप उडाली आहे त्यात सतत अनेक सेलिब्रेटी हे ट्रोलही होत असतात. सध्या एकता कपूर (Ekta Kapoor) ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नुकताच अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या आगामी 'गुडबाय' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता ज्यात निर्माती एकता कपूरसोबत चित्रपटातील इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.
यावेळी कुठल्यातरी गोष्टीमुळे अचानक एकता कपूर भावूक झाली. कुटुंबाबद्दल बोलताना एकता रडली पण तिचे अश्रू युजर्सना मात्र खोटे वाटले आणि यावरून तिला खोटे अश्रू दाखवल्याबद्दल एकताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
एकता कपूर का रडली?
एकताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इव्हेंटमध्ये एकता तिच्या कुटुंबाशिवाय तिचे आयुष्य काय असेल यावर प्रेक्षकांशी संवाद साधताना भावूक होते. एकता म्हणते, "सर्वात कठीण दिवस तो असतो जेव्हा तुम्हाला जन्म देणारे पालकच तुमच्यासोबत नसतात. तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक दिवस येतो. त्या भीतीने लोक कसे जगतात हेच कळत नाही. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण हा चित्रपट एका कुटुंबाबद्दल आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबाशिवाय काहीच नाही. मी माझ्या कुटुंबाशिवाय राहूच शकत नाही.
यावर युझर्सनी तिला चांगलंच ट्रोल केले आहे. चित्रपट प्रोमट करण्यासाठी ही चांगली निन्जा टेकनिक आहे असं त्यांनी सांगितले आहे.
एका यूजरने लिहिले की, "ती खोटे रडत आहे. ..एकता कपूर”ने आणखी एकाने “फिर कोई नवा ड्रामा स्टार्ट” असे लिहिले. 'गुडबाय'मध्ये (Good Bye) रश्मिकासोबत पावेल गुलाटी, नीन गुप्ता आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.