Actress Marries Secretly : पाकिस्तानी अभिनेत्री अस्मा अब्बास यांची एक धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे. त्यांचा नवरा अब्बास गिल याने एका अभिनेत्रीसोबत गुप्तपणे लग्न केले. 2 महिने 10 दिवसातच दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं बोलले गेले. अब्बास गिलने अस्मा अब्बासच्या वडिलांशी बोलणी केली आणि मग लग्न केले.
अस्मा अब्बास यांनी एका दूरचित्रवाणीच्या यूट्यूब चॅनलवर त्यांच्या गुप्त लग्नाशी संबंधित संपूर्ण कहाणी सांगितली आहे.अस्मा अब्बास म्हणाल्या की, माझ्या पतीच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. त्यांना मूलबाळ नव्हते. तो कुटुंबातील सर्वात मोठा होता. वारस हवा म्हणून कुटुंबीय मूल मागायचे. अब्बास यांना मूल होऊ द्यायचे नव्हते.
त्याचे पहिल्या पत्नीवर खूप प्रेम होते. थिएटरमध्ये काम करत असताना मी अब्बास यांना भेटले. जेव्हा मी त्याच्या प्रेमात पडलो तेव्हा मी 23 वर्षांची होते. ते माझ्यासाठी खूप काही करायचे. छान गोष्टी करत होते. त्याच्या प्रेमात पडायला मला फक्त 4 दिवस लागले मग 2 महिने 10 दिवसातच आम्ही लग्न उरकले.
अस्मा अब्बास पुढे म्हणाल्या की, अब्बास गिल माझ्या आईशी बोलला. मग लग्न झाले. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला आमच्याबद्दल सांगितले नाही. असं केलं तर तो अडचणीत येईल असे त्यानेसांगितले.
आमच्या लग्नाच्या दीड वर्षानंतर अब्बास यांच्या पहिल्या पत्नीची ओळख झाली. त्यांच्या जेव्हा आमच्या लग्नाबद्दल कळलं तेव्हा त्या दुखावल्या. मी तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्या गप्पच होत्या. त्यांना घडलेल्या गोष्टी सांगितल्या.
पण आम्ही एकमेकांना समाज दर्जा दिला, आम्ही कधीच एकमेकांना नावाने हाक मारायचो नाही. आम्ही दोघी एकाच घरात राहत होतो. त्यांच्या पहिल्या पत्नीनं मला शिवणकामही शिकवलं, आम्ही दोघीही चांगल्या मैत्रीणी झालो.