प्रियांकाचे जखमी अवस्थेतील फोटो पाहून चाहत्यांना 440 वोल्टचा झटका; हे काय झालं?

तिला नेमकं काय झालं? 

Updated: Aug 27, 2021, 08:22 PM IST
प्रियांकाचे जखमी अवस्थेतील फोटो पाहून चाहत्यांना 440 वोल्टचा झटका; हे काय झालं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर तिनं हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. जागतिक पटलावर आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री करिअरच्या उत्तुंग शिखरावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांका तिच्या जीवनातील बरेच क्षण चाहत्यांशी शेअर करते. त्यामुळं सहाजीकच चाहत्यांसोबत तिचं नातं दिवसागणिक अधिक खास होत आहे.

प्रियांकाचं चाहत्यांनी असणारं तिचं नातं स्वाभाविकपणेच खास आहे. ज्यामुळं तिला अडचणीत पाहून चाहतेही कासावीस होतात. याचीच प्रचिती सध्या येत आहे. प्रियांकानं नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन असे काही फोटो शेअर केले जे पाहून, चाहते विचलित झाले. 

तिला नेमकं काय झालं, असाच प्रश्न विचारू लागले. देसी गर्लनं पोस्ट केलेल्या या फोटोंवर (Priyanka Chopra Photos) बरीच चिंता व्यक्त केली गेली. पण प्रत्यक्षात मात्र तितकी चिंता करण्याचं कारण नाही. प्रियांकाचे हे फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टच्या सेटवरील आहेत. येत्या काळात प्रियांका ज्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येईल, त्याचीच झलक या फोटोंच्या माध्यातून पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तिला दुखापत झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे पाहूनच तिला नेमकं काय आणि कसं लागलं हाच प्रश्न फोटो पाहताक्षणी चाहत्यांना पडला.

प्रियांकाप्रती चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता तिचं त्यांच्याशी असणारं नातं सर्वांसमक्ष ठेवून गेली. देसी गर्ललाही ही बाब अतिशय सुखद वाटली असणार यात शंका नाही. तिनं शेअर केलेल्या या फोटोंचीच इतकी चर्चा झालीये, त्यामुळं आता नेमका आगामी चित्रपट किंवा सीरिज कशी असेल याबाबतही चाहत्यांकडून कुतूहल व्यक्त केलं जात आहे.