श्रीदेवीची मुलगी आर्यन खानच्या प्रेमात? इन्स्टाग्राम पोस्टवरून चर्चांना उधाण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आर्यन खानच्या प्रेमात, सोशल मीडियावर व्यक्त केले प्रेम, श्रीदेवीशी आहे खास नाते?

Updated: Sep 16, 2022, 09:46 PM IST
श्रीदेवीची मुलगी आर्यन खानच्या प्रेमात? इन्स्टाग्राम पोस्टवरून चर्चांना उधाण  title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात निर्दोष मुक्त झाला आहे. या आरोपांतून मुक्त झाल्यानंतर फार कमी वेळ तो मीडियात चर्चेत आला होता. त्यात आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळेस चर्चेत येण्यामागचं कारण एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ठरलीय. ही अभिनेत्री आर्यन खानच्या प्रेमात असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शाहरूखच्या मुलावर प्रेम करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु झालीय. 

शाहरुख खानचा (shah rukh khan)  मुलगा आर्यन खानवर (Aryan Khan) श्रीदेवीच्या मुलीचं प्रेम जडल्याची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर ती आर्यन खानच्या प्रेमात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

पोस्टमध्ये काय? 
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने आर्यन खानचा  (Aryan Khan)  फोटो पोस्ट केला होता. या फोटोत आर्यन पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला होता. त्याचा हा जूना फोटो आहे. या फोटोवर अभिनेत्रीने एक हार्ट इमोजी शेअर केला होता. तसेच फोटोच्या बॅकग्राऊंडला शाहरुख खान आणि अनुष्काचे हिट गाणे हवाये देखील जोडले होते. या पोस्टनंतर प्रसिद्ध अभिनेत्री आर्यनच्या प्रेमात असल्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.

श्रीदेवीशी कनेक्शन काय? 
प्रसिद्ध अभिनेत्री सजल अलीने (Sajan Ali) आर्यन संदर्भातली ही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. सजल अलीने हिने बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. श्रीदेवीच्या मॉम या सिनेमात ती झळकली होती. या सिनेमात सजलने (Sajan Ali) श्रीदेवीची मुलगी आर्याची भूमिका साकारली होती. त्यामुळे श्रीदेवी आणि तिचं या सिनेमात कनेक्शन होतं. म्हणूनचं श्रीदेवीची सिनेमातली मुलगी सजल अली आर्यनच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. 

कोण आहे ही अभिनेत्री ?
सजल अली (Sajan Ali) ही एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ती पाकिस्तानी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. सजलने 2017 मध्ये मॉममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी सोबत काम केले आहे. 

दरम्यान आता सजल (Sajan Ali) लवकरच 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' या आगामी बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. शेखर कपूर दिग्दर्शित हा चित्रपट २०२२ च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.