दारुच्या दुकानांबाहेरील तरुणींविषयी राम गोपाल वर्मा असं काही म्हणाला की....

Coronavirusशी संपूर्ण देशाता लढा सुरु असतानाचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही कोरोना काही नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळं शासनाकडून सावधगिरी म्हणून पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरीही या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले. ज्ययामध्ये दारुची दुकानं सशर्त खुली करण्याचीही परवानगी देण्यात आली. 

Updated: May 5, 2020, 11:46 AM IST
दारुच्या दुकानांबाहेरील तरुणींविषयी राम गोपाल वर्मा असं काही म्हणाला की....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Coronavirusशी संपूर्ण देशाता लढा सुरु असतानाचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही कोरोना काही नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळं शासनाकडून सावधगिरी म्हणून पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरीही या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले. ज्ययामध्ये दारुची दुकानं सशर्त खुली करण्याचीही परवानगी देण्यात आली. 

मद्यविक्री पुन्हा सुरु होणार या बातमीनेच तळीराम सुखावले. ४ मे पासून देशातील बहुतांश भागांमध्ये सुरु झालेल्या या दारुच्या दुकानांवर अनेकांनी गर्दी करत मद्य खरेदी केल्याचं पाहायला मिळाल. मुख्य म्हणजे दारुच्या दुकानांबाहेर लागलेल्या या रागांमध्ये महिलाही पाहायला मिळाल्या. चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतही हे चित्र पाहायला मिळालं. 

 हा फोटो शेअर करत त्याने सोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये मुलींच्या दारु खरेदीवर नाराजी व्यक्त केली. 'पाहा पाहा, दारु खरेदी करण्यासाठी लागलेल्या लांबलचक रांगेत कोण उभं आहे... याच तळीरामांविरोधात आवाज उठवत असतात...', असं ट्विट त्याने केलं. 

वर्माच्या या वादग्रस्त ट्विटची सोशल मीडियाच्या वर्तुळात चर्चा सुरु होत नाही, तोच गायिका सोना मोहापात्रा हिने त्याचा खरपुस समाचार घेतला. तुम्हालाही एका अशाच रांगेत उभं राहण्याची गरज आहे, जिथे किमान चांगली शिकवण मिळत असेल, असं लिहित सोनाने RGV वर तोफ डागली.  'पुरुषांप्रमाणेच महिलांनाही दारु खरेदी करण्याचा हक्क आहे. हो, पण मद्यप्राशन केल्यानंतर हिंसक होण्याचा अधिकार कोणालाही नाही', असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं. 

 

गेल्या बऱ्याच काळापासून बंद असणारी दारुची दुकानं पुन्हा सुरु होण्याच्या या मुद्द्यावरुन कलाविश्वातील या दोन सेलिब्रिटींमध्ये चांगलाच वाद पेटला. दरम्यान, दारुची दुकानं सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. बहुतांश ठिकाणी तळीरामांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या, तर काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस यंत्रणांना वाईन शॉपबाहेर उभ्या असणाऱ्या गर्दीला अनुसरुन कठोर पावलंही उचलावी लागली.