विकास दुबे एन्काऊंटरशी रोहित शेट्टीचं कनेक्शन?

या घटनेनंतर लगेचच.... 

Updated: Jul 10, 2020, 04:13 PM IST
विकास दुबे एन्काऊंटरशी रोहित शेट्टीचं कनेक्शन?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कुख्यात गुंड Vikas Dubey विकास दुबेच्या एन्काऊंटरची सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत बरीच चर्चा झाली. सुरुवातीला त्याचा एन्काऊंटर झाल्याचीच माहिती समोर आली. कालांतरानं ही घटना नेमकी कशी आणि कुठं घडली याचा अधिकृत तपशीलही प्रसिद्ध करण्यात आला. 

एन्काऊंटर नेमका कसा झाला, याचीच माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियायवर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं. अनेकांनी ही एन्काऊंटरची कारवाई एखाद्या चित्रपटात रचलेल्या दृश्याप्रमाणे असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या. कित्येकांनी तर थेट ऍक्शनपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टी याचंही नाव यात पुढे आणत त्यालाही या घटनेशी जोडलं. 

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये विकास दुबेचा खात्मा नेमका कसा करण्यात आला, याची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यात एका उलटलेल्या वाहनाचाही उल्लेख करण्यात आला होता. याच धर्तीवर रोहित शेट्टीचं नाव यात पुढे आलं. 

सहसा रोहितच्या चित्रपटांमध्ये कार, गाड्या उडणं, त्यांचे अपघात होणं, स्फोट होणं अशई दृश्य सर्रास पाहायला मिळतात. 'सिंबा', 'सिंघम', 'चेन्नई एक्स्प्रेस' ही त्यापैकीच काही नावं. त्यामुळं या गंभीर प्रकरणातही नेटकऱ्यांनी त्यांचं घोडं पुढं दौडवत काही मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली. 

 

'ये तो मेरी वाली स्क्रिप्ट है', 'हमने मुव्ही मे किया था; पुलिस वालों ने रिअर लाईफ मे अप्लाय किया' अशा ओळी लिहित इंटरनेटवर हे प्रकरण एका वेगळ्या कारणामुळं नेटकऱ्यांनी उचलून धरल्याचं पाहायला मिळालं.