Shocking : पती रणवीर सिंगविरोधात दीपिकाची तक्रार; वचन तोडलं आणि....

याची अपेक्षाच नव्हती.... 

Updated: Sep 6, 2021, 10:35 PM IST
Shocking : पती रणवीर सिंगविरोधात दीपिकाची तक्रार; वचन तोडलं आणि....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिचा पती, अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Shingh) ही जोडी बॉलिवूड वर्तुळातील आयडियल कपल म्हणून ओळखली जाते. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंकर रणवीर आणि दीपिकानं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेत या प्रेमाच्या नात्याला एक नवं नाव दिलं. 

विविध कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, सेलिब्रिटी पार्टी या ठिकाणी 'दीप-वीर'ची एकत्र उपस्थिती दिसून आली. पण, आता म्हणे दीपिकानं रणवीरविरोधात तक्रार केली आहे. बसला ना तुम्हालाही धक्का? 

अपेक्षाच नसताना असं काही कानावर येताच धक्का बसणं सहाजिक आहे. पण, हे प्रकरण जरा वेगळं आहे. दीपिकानं रणवीरची तक्रार केली खरी, पण ती बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे. 

'केबीसी 13' च्या नव्या भागात नुकतीच दीपिकानं हजेरी लावली होती, तेव्हा तिनं बिग बींकडे रणवीरची तक्रार केली. रणवीरनं वचन दिलं होतं की, आपल्याला तो रोज ब्रेकफास्ट करुन देईन. पण, आजपर्यंत असं काही झालं नाही. 

दीपिकाची ही तक्रार ऐकून अमिताभ बच्चन यांनी रणवीरला थेट फोन केला आणि त्याला दीपिकाच्या तक्रारीबद्दल सांगितलं. 'आप खाना नहीं बनाते, इतने सालों से बोल रही हैं', असं ते रणवीरला म्हणाले. यावर उत्तर देत रणवीर मोठ्या विनोदी अंदाजात म्हणाला, 'अब बच्चन साहब ने बोल दिया। अब तुझे मैं गोद में बैठा के ऑमलेट खिलाऊंगा'. 

रणवीरच्या, 'गोद मे बिठाके खिलाऊँगा' यावर जोर देत तिथं उपस्थित असणाऱ्या दिग्दर्शिका फराह खान हिनं त्याची फिरकी घेतली. फक्त ऑमलेट खाऊ घालायला सांगितलं होतं, उचलून घ्यायला नाही.... फराहनं रणवीरची फिरकी घेतली आणि मग तिथं एकच हशा पिकला.