'या' सेलिब्रेटिंना वाटते ट्रोलिंगची भीती? सोशल मीडियापासून असतात चार हात दूर

Bollywood Celebrities who are not on social media: सोशल मीडिया हा सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा भाग झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की असेही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहे जे सोशल मीडिया अजिबात वापरत नाहीत. तेव्हा पाहुया हे सेलिब्रेटी कोणते? 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 5, 2023, 10:55 PM IST
'या' सेलिब्रेटिंना वाटते ट्रोलिंगची भीती? सोशल मीडियापासून असतात चार हात दूर title=
July 5, 2023 | bollywood celebrities who dont use social media know the full list

Celebrities who are not on social media: सोशल मीडिया हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सोबतच त्याशिवाय आता अपडेट राहणंही महत्त्वाचं झाले आहे. त्यातून आपल्याला आपल्या लाडक्या सेलिब्रेटींचे सर्व अपडेट्सही सोशल मीडियावरूनच मिळतात. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमचे असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत जे सोशल मीडियाचा अजिबातच वापर करत नाहीत. परंतु त्यांचे सेलिब्रेटी पती किंवा पत्नी हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यामुळे हे सेलिब्रेटी ट्रेलिंगपासूनही स्वत:चा बचाव करून आहेत. तुम्हाला माहितीये का की या लिस्टमध्ये नक्की कोण कोण आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले पण हे सर्व सेलिब्रेटी आजच्या पिढीचे असूनही सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. चला पाहुया तुमच्या आवडत्या सेलिब्रेटीचा यात कितवा नंबर आहे?

रणबीर कपूर 

रणबीर कपूर हा तरूणाईच्या गळ्यातला ताईत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या सर्व अपडेट्स हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते हे आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु तो सोशल मीडियावर सक्रिय नाही. तर आलिया भट्ट ही सोशल मीडियावर सक्रिय आहे. 

रेखा 

अभिनेत्री रेखा या आजही एव्हरग्रीन आहेत. त्यांच्याबद्दल अनेकदा बोललं जातं आणि लिहिलं जातं. सध्या त्यांचे व्होगमधील फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे. परंतु अनेक कलाकार हे सोशल मीडियावर आहेत परंतु रेखा मात्र सोशल मीडियापासून या दूर आहेत. 

नयनतारा 

अभिनेत्री नयनतारा ही सोशल मीडियावर सक्रिय नाही. तिनं विग्नेश शिवानशी लग्न केले आहे. परंतु तिचे अपडेट हे अनेकदा त्याच्या सोशल मीडियावरून दिसतात. नयनतारा ही लोकप्रिय दाक्षिणात्त्य अभिनेत्री आहे तिच्या फॅन्समध्येही वाढ होत राहते. 

फहाद फासिल

पुष्पा फेम अभिनेता फहाद फासिलदेखील सोशल मीडियावर सक्रिय नाही. परंतु तो इंटरनेटवर चांगलाच सक्रिय असतो. Pushpa या चित्रपटातून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. 

राणी मुखर्जी

राणी मुखर्जी ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचेही लाखो चाहते आहेत. परंतु ती मात्र सोशल मीडियावर सक्रिय नाही. राणी मुखर्जी ही पुर्णत: खाजगी आयुष्य ठेवते. 

आमिर खान 

आमिर खान हा बॉलिवू़डचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. परंतु तो मात्र सोशल मीडियावर अजिबातच सक्रिय नाही. त्याची लेक आयरा खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. परंतु आमिर खान हा प्रायव्हेट आहे. 

सैफ अली खान 

करीना कपूरही आधी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती परंतु आता ती सोशल मीडियावर सक्रिय आहे त्यातून सैफ अली खान मात्र सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्याचे सर्व अपडेट्स हे करीनाच्या इन्टाग्राम पेजवरून मिळतात.