आमिर खान कमबॅकसाठी सज्ज; 10 वर्षांनी राजकुमार हिरानीसोबत करणार बायोपिक

Aamir Khan Comeback: मागच्या वर्षी आमिर खानचा चित्रपट फ्लॉप झाला त्यामुळे सर्वत्र खळबळच माजली. त्यानंतर आमिर खान मात्र बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही. आता मात्र तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 5, 2023, 10:49 PM IST
आमिर खान कमबॅकसाठी सज्ज; 10 वर्षांनी राजकुमार हिरानीसोबत करणार बायोपिक title=
July 5, 2023 | amir khan to make his comeback from a biopic with rajkumar hirani says report

Aamir Khan Comeback: बॉलिवूडच्या हिरो आमिर खानला मागील वर्षी आलेल्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटानं चांगलाच धक्का दिला. आपल्या प्रेक्षकांना गयावया करूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकला नाही. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे आमिर खानच्या कमबॅकची. आमिर खान आता राजकुमारी हिरानी यांच्या नव्या बायोपिकमधून पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. आमिर खाननं याआधी बायोपिक केला आहे आणि तो म्हणजे मंगल पांडे यांचा. आता आमिर खान कुठल्या नव्या भुमिकेतून आपल्या समोर येणार आहे याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. आमिर खान आणि राजकुमारी हिरानी हे दोघं 2014 साली आलेल्या 'पीके' या चित्रपटानंतर पुन्हा एकत्र येतील. 

त्याआधी त्यांनी 2009 साली आलेल्या '3 इडियट्स' या चित्रपटातून एकत्र कामं केले होते. आता तो पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज असून राजकुमार हिरानीसोबत तो एक बायोपीक करतो आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, राजकुमार हिरानी आणि आमिर खान हे दोघं आगामी एका बायोपिकवर एकत्र काम करत आहेत. 2024 पासून या चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार आहे. सध्या राजकुमार हिरानी हा शाहरूख खानसोबतच्या 'डंकी' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कोणता, त्याचा विषय काय आणि तो कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल आता त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या या चित्रपटाविषयी फार अपडेट नाहीत. 

आमिर खाननं काही दिवसांपुर्वी 'कॅरी ऑन जट्टा 3' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं आपल्या कमबॅकविषयी भाष्य केले होते. त्यात तो म्हणाला होता की, ''सध्या तरी कोणता सिनेमा करण्याचा मी निर्णय घेतलेला नाही. सध्या मी कुटुंबियांसमवेत माझा जास्तीत जास्त वेळ घालवतो आहे. मला मुलांसोबत वेळ घालवायला आवडत त्यामुळे मी सध्या त्यावर लक्ष देतो आहे.''

हेही वाचा - कुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर; लोकप्रिय अभिनेत्रीचे वडिलांवर गंभीर आरोप...

''सिनेसृष्टीत कमबॅक करण्याची मानसिक तयारी अजून झालेली नाही असं त्यानं म्हटलं आहे. परंतु यातही त्यानं एक हीट सोडली होती. तो म्हणाला की जेव्हा मी पुर्णपणे तयार असेल तेव्हा नक्कीच जर एक चांगली कथा येणार असेल तर मी नक्कीच सिनेमा करेन.'' असं तो म्हणाला.