Yami Gautam ला असा आजार, ज्याचा नाही कोणताच उपाय; जाणून घ्या लक्षणं

साऱ्यामध्ये यामीबद्दल एक अशी माहिती समोर आली, आहे ज्यामुळं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Updated: Oct 6, 2021, 09:04 AM IST
Yami Gautam ला असा आजार, ज्याचा नाही कोणताच उपाय; जाणून घ्या लक्षणं  title=
यामी गौतम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिनं काही दिवसांपूर्वीच तिच्या जीवनातील एका नव्या टप्प्याची सुरुवात केली. दिग्दर्शक आदित्य धर याच्यासह यामीनं लग्नगाठ बांधत जीवनाचा हा प्रवास सुरु केला. सोबतच ती आगामी चित्रपटांच्या निमित्तानं तिच्या कारकिर्दीवरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये यामीबद्दल एक अशी माहिती समोर आली, आहे ज्यामुळं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यामीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला असणाऱ्या एका आजाराची माहिती दिली आहे. हा एक असा आजार आहे, ज्यावर कोणताही उपाय अस्तित्वात नाही. यामीनं पोस्ट लिहित त्यामध्ये उल्लेख केल्यानुसार, ‘हल्लीच माझं एक फोटोशूट झालं होतं आणि फोटो पोस्ट प्रोडक्शनसाठी पाठवण्यात येणार होते. त्याचवेळी मी ठरवलं की मला असणाऱ्या या आजाराचा स्वीकार करण्यात काहीच वावगं नाही. मी तारुण्यावस्थेत असल्यापासून या आजाराशी दोन हात करत आहे. याचं नाव आहे केराटोसिस पिलारिस. मी या आजारपणाविषयी तुम्हा सर्वांनाच सांगू इच्छिते. ज्यांना या आजाराविषयी माहिती नाही, त्यांच्यासाठी.... या आजारामध्ये चेहऱ्यावर लहान लहान पुरळं येतात. हे इतकेही वाईट नसतात जसं त्यांच्याकडे पाहिलं जातं. लहान वयातच माझ्या चेहऱ्यावर हे पुरळ दिसले ज्यांचा कोणताच उपाय नाही. मी अनेक वर्षे हे सहन केलं. शेवटी मी माझ्यामध्ये असणाऱ्या या गोष्टीचा स्वीकार केला. मी तुम्हा सर्वांसोबत माझं हे सत्य शेअर केलं.’

यामीनं उल्लेख केलेला हा आजार कोणालाही होऊ शकतो. लहान वयातच याचं प्रमाण जास्त दिसून येतं. या आजाराची काही लक्षणं खालीलप्रमाणे....

  • जांघा, गालांवर वेदना असणारे पुरळ येणं
  • पुरळ आलेली त्वचा रुक्ष दिसणं
  • त्वचेवर असणारी ही त्वचा खरखरीत दिसणं