Katrina Kaif सोबत होत असलेल्या तुलनेवर Vaani Kapoor म्हणाली, माझी तुलना...

कतरिना कैफच्या तुलनेवर 'हे' काय बोलून गेली वाणी कपूर, तिच्या विधानाची बॉलिवूडमध्ये एकच चर्चा रंगलीय

Updated: Jul 11, 2022, 05:28 PM IST
 Katrina Kaif सोबत होत असलेल्या तुलनेवर Vaani Kapoor म्हणाली, माझी तुलना... title=

मुंबई : बॉलिवू़ड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) सध्या तिच्या आगामी 'शमशेरा' (Shamshera) चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तिची तुलना बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफशी (Katrina Kaif)   केली जात असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर आता प्रथमच वाणी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.  

वाणी कपूरची (Vaani Kapoor) तुलना 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या कतरिना कैफशी केली जात आहे. ही तुलना वाणी कपूरने एका संभाषणात नकारलीय. ती म्हणते, असे अजिबात नाही कारण तुम्ही ट्रेलर आणि गाण्यात खूप मर्यादित गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामधून अंदाज बांधणे कठीण असल्याचे वाणीने म्हटलंय. 

वाणी (Vaani Kapoor) पुढे म्हणते की, चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकते की हा खूप वेगळा चित्रपट आहे. मी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' पाहिला आहे. दोन्ही चित्रपट आणि कतरिना कैफशी माझी तुलना योग्य नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.  

'कतरिना कैफ एक उत्तम डान्सर, अभिनेत्री आहे. तिच्याशी होत असलेल्या तुलनेमुळे मी आनंदी आहे. जर तुम्ही माझी तुलना तिच्या सौंदर्याशी केली तर मी त्यासाठी आनंदी आहे. चित्रपटात माझी व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने लिहिली गेली आहे ती वेगळी असल्याचे ती सांगते.  

दरम्यान 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलैला हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर डबल रोलमध्ये दिसणार आहे. वाणी कपूरसोबतची त्याची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'शमशेरा'मध्ये (Shamshera) संजय दत्त निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करत आहे.