अरे बापरे... हे काय झालं? सनी लिओनीच्या चाहत्यांना का वाटतेय तिची चिंता?

ही चिंता आता नेमकी कोणत्या कारणामुळे आणि सनीला नेमकं काय झालंय, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

Updated: Feb 17, 2022, 02:47 PM IST
अरे बापरे... हे काय झालं? सनी लिओनीच्या चाहत्यांना का वाटतेय तिची चिंता?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘बेबी डॉल’, म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सनी कायम काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला कमाल लाईक आणि शेअर्सही मिळतात. पण, आता मात्र तिच्या चाहत्यांना या सौंदर्यवतीची चिंता वाटू लागली आहे. 

ही चिंता आता नेमकी कोणत्या कारणामुळे आणि सनीला नेमकं काय झालंय, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

त्याचं झालं असं, की सनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिच्या पायाला इजा झाल्याचं दिसत आहे. 

सनीच्या चेहऱ्यावर आणि पायावर असणारी जखम सर्वांनाच चिंतेत टाकत आहे. ज्यामुळं अर्थातच चाहते चिंता व्यक्त करु लागले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

तुम्हालाही तिच्याबद्दल चिंता वाटत असेल, तर तसं वाटून घेण्याची गरज नाही. कारण, चित्रीकरणादरम्यानची ही दृश्य आहेत. सनीला कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा इजा झालेली नाही. 

खुद्द सनीनंच आपण येत्या काळात एका नव्या आणि तितक्याच आकर्षक प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे.