सासूबाईंनी सोनमला दिली 'ही' खास भेट

ईशाच्या साखरपुड्यातील सोनमची ही अदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. 

Updated: Sep 22, 2018, 07:27 PM IST
सासूबाईंनी सोनमला दिली 'ही' खास भेट  title=

मुंबई: अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा सध्या इटलीमध्ये असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सेलिब्रिटी जोडी सर्वांनाच 'कपल गोल्स' देत आहे.  इटलीमध्ये सोनम पोहोचली आहे ती म्हणजे ईशा अंबानीच्या साखरपुड्याच्या समारंभासाठी. अतिशय दिमाखदार अशा या समारंभासाठी बॉलिवूडच्या फॅशनिस्टा सोनमने खास ड्रेसला प्राधान्य दिलं होतं. 

सोशल मीडियावर खुद्द तिनेच याविषयीची पोस्ट लिहित हा ड्रेस आपल्याला आनंदच्या आईने दिल्याचं सांगितलं. 

कृष्णधवल रंगातील या फोटोमध्ये सोनम आणि आनंद अतिशय सुरेख दिसत असून जणू एखाद्या परीकथेतीलच ते दृश्य असल्याचा भास होत आहे. 

आपण या वेशात अगदी परीप्रमाणे दिसत असल्याचं म्हणत, सोनमने ही भेटवस्तू फार आवडल्याचं सांगितलं. 

वाढदिवसाच्या निमित्ताने सोनमच्या सासूबाईंनी तिला संदीप खोसला आणि अबू जानी यांनी डिझाईन केलेला सुरेख असा लेहंगा भेट म्हणून दिला होता. 

ईशाच्या साखरपुड्यातील सोनमची ही अदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून , तिच्या सासरच्यांविषयी जाणून घेण्यासाठीही अनेकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

सोनम आणि आनंदव्यतिरिक्त या घडीला इटलीमध्ये कलाविश्वातील बऱ्याच मंडळींची उपस्थिती आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, तिचा होणारा पती निक जोनास, अभिनेता अनिल कपूर यांचा समावेश आहे.