शिल्पाने पती राज कुंद्रासोबत असं काही केलं की...

पाहा शिल्पा आणि राज कुंद्राचा व्हिडिओ....

Updated: Jan 12, 2020, 03:04 PM IST
शिल्पाने पती राज कुंद्रासोबत असं काही केलं की... title=

मुंबई : बॉलिवूड फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आता अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. सिल्व्हर स्क्रिनपासून दूर असूनही शिल्पाचे सोशल मीडियावर जबरदस्त चाहते आहेत. सोशल मीडियावरुन ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नव-नवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत शिल्पा इन्स्टाग्राम, ट्विटरवर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिच्या विविध फोटोमुळे शिल्पाची सोशल मीडियावर चर्चा असते. आता शिल्पाने पती राज कुंद्रासोबत  (Raj Kundra) एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राज एकत्र आहेत. दोघेही कॉमेडी करताना पाहायला मिळतायेत. व्हिडिओमध्ये दोघांच्या कॉमिक टायमिंगचं कौतुक केलं जात आहे. अनेक चाहत्यांच्या मजेशीर कमेंटही या व्हिडिओत येत आहेत. 

 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

दरम्यान, शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पाने तिच्या योगाच्या व्हिडिओ सीडी आणि तिचं फिटनेस ऍप लॉन्च केलं आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पाची केंद्र सरकारच्या फिट इंडिया Fit India अभियानासाठी असलेल्या कमेटीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 

शिल्पा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी, तिने रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिलं आहे. छोट्या पडद्यावर ती नेहमी चाहत्यांशी जोडलेली होती. लवकरच शिल्पा तब्बल १३ वर्षांनंतर आगामी 'निकम्मा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. शिवाय ती 'हंगामा'च्या सिक्वेलमध्ये परेश रावल याच्यासोबत भूमिका साकारणार आहे.