Making Video : 'केदारनाथ' साकारतेवेळी अशी करण्यात आली प्रयत्नांची पराकाष्ठा

पाहा एक चित्रपट साकारण्यासाठी नेमकी किती आणि कशी मेहनत लागते  

Updated: Dec 19, 2019, 05:29 PM IST
Making Video : 'केदारनाथ' साकारतेवेळी अशी करण्यात आली प्रयत्नांची पराकाष्ठा  title=
केदारनाथ

मुंबई : रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असा म्हणणारा एक वर्ग आहे. तर एक वर्ग आहे, चित्रपटांकडे अधिक गांभीर्याने आणि तितक्याच आपलेपणाच्या भावनेने पाहणारा. एक असा वर्ग ज्याला कायमच या कलेप्रती आत्मियता वाटली आहे. अशाच काही अफलातून कलाकारांची फौज साधारण दोन वर्षांपूर्वी एकत्र आली होती. निमित्त होतं ते म्हणजे केदारनाथ या चित्रपटाचं. 

काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष लोटलं. प्रदर्शनाच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी जवळपास एक वर्षाहून अधिक काळापासून या चित्रपटाच्या तयारीसाठी अनेकजणांनी मेहनत घेतली होती. पडद्यावर झळकणारी सैफ अली खानची लेक सारा अली खान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत, त्यांना चित्रपटाचं कथानक वेळोवेळी समजवून सांगणारा दिग्दर्शक अभिषेक कपूर किंवा मग या चित्रपटाचा सेट उभारण्यासाठी मेहनत घेणारे कारागिर. या प्रत्येकाच्याच मेहनतीचं फळ म्हणजे 'केदारनाथ'ला मिळालेलं घवघवीत यश. 

....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं 

उत्तराखंड येथे आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर या प्रसंगाचा आधार घेत एका प्रेमकहाणीचं सुरेख चित्रण 'केदारनाथ'च्या निमित्ताने करण्यात आलं. चित्रपटाच्या मेकिंगच्या व्हिडिओतून ही सर्व प्रक्रिया सर्वांपुढे सादरही करण्यात आली. हवामानात होणारे बदल, त्यात चित्रपटाचं चित्रीकरण ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा अट्टहास या साऱ्यासाठी अभिषेक कपूर या दिग्दर्शकाने बऱ्याच प्रयत्नांनी आणि सहनशीलतेने हा चित्रपट साकारला. श्रद्धा, प्रेम, विश्वास आणि कमातील समर्पक वृत्ती या गोष्टी या चित्रपटाचा गाभा ठरल्या. 

पदार्पणाचा चित्रपट असूनही साराने कशा प्रकारे तिच्या वाट्याला आलेली भूमिका निभावली हे खुद्द दिग्दर्शकानेच या मेकिंगच्या व्हिडिओतून सांगितलं आहे. तर, शब्दांवाटे कथानक कसं पुढे गेलं याचा खुलासा लेखिकेकडून करण्यात आला आहे. प्रलयाच्या दृश्यांचं चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेली तंत्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर साहस दृश्यांमध्ये महारथ असणारी माणसं हाताशी घेत एक सुरेख कलाकृती प्रेक्षकांपुढे सादर करण्यात आली. जिचं नाव होतं 'केदारनाथ'.