वाढलेलं वजन, नो मेकअप लूक; कॅमेरासमोर येताच Priyanka Chopraनं का फिरवलं तोंड?

सरोगसीच्या माध्यमातून या जोडीनं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं

Updated: Mar 4, 2022, 04:47 PM IST
वाढलेलं वजन, नो मेकअप लूक; कॅमेरासमोर येताच Priyanka Chopraनं का फिरवलं तोंड?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास यांच्या सहजीवनाच काही दिवसांपूर्वी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं. सरोगसीच्या माध्यमातून या जोडीनं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. (Priyanka Chopra Nick Jonas)

अभिनय क्षेत्रात पदार्पण करत प्रियांकानं कलाजगतात पाय घट्ट रोवले. वैवाहिक नात्यात स्थिरावल्यानंतर तिनं बाळाचा निर्णयही घेतला. 

अभिनय, निर्मिती, हॉटेलिंग व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय असणारी आणि सतत व्यग्र असणारी प्रियांका आता मात्र तिच्या कुटुंबाला आणि लेकिला जास्तीत जास्त वेळ देताना दिसत आहे. 

यादरम्यान, प्रियांकाचं स्वत:कडे मात्र लक्षच नसल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे तिचे फोटोच खूप काही सांगून जात आहेत. 

लेकिसाठी घराचा कायापालट करणारी प्रियांका यावेळी जेव्हा सर्वांसमोर आली तेव्हा तिला ओळखणंही कठीण झालं. कारण, एकतर ती त्यावेळी नो मेकअप लूकमध्ये होती आणि दुसरं म्हणजे तिचं वजन वाढल्याचं स्पष्ट दिसत होतं. 

मानेवर गुंडाळलेले केस, काळ्या रंगाचा सिंगल स्ट्रीप टॉप, त्यावर जॅकेट अशा रुपात ती दिसली. यावेळी तिचं वाढलेलं वजन चर्चेचा विषय ठरलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Just Jared (@justjared)

आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर असल्याचं कळताच प्रियांका कॅमेऱ्यांना टाळतानाही दिसली. 

अद्यापही बी- टाऊनची ही देसी गर्ल तिच्या मुलीला घेऊन माध्यमांसमोर आलेली नाही. प्रसूतपूर्व काळातच मुलीचा जन्म झाल्यामुळं तिचा आवश्यक तितका वेळ देत त्यानंतर प्रियांका पुढील निर्णय घेण्याची माहिती समोर आली आहे.