kim kardashian च्या पाऊलावर पाऊल ठेवतेय मलायका अरोरा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मलायका आणि अमृता पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Updated: Sep 17, 2022, 07:22 PM IST
kim kardashian च्या पाऊलावर पाऊल ठेवतेय मलायका अरोरा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?  title=

Malaika Arora: बी-टाऊनमध्ये तुम्ही बरीच कपल्स पाहिली असतील पण बॉलिवूडमध्ये बहिणींची जोडी (Sisters In Bollywood) कुणापेक्षा कमी नाही. करीना - करिश्मा (Karishma - Katrina), मलायका - अमृता (Malaika - Amrita), आलिया भट्ट - शाहीन (Alia Bhatt - Shahin) व्यतिरिक्त इतर अनेक स्टार बहिणी आहेत ज्या कधीच आपल्या बहिणीची साथ सोडत नाहीत. कायम एकत्र असतात. (bollywood actress malaika arora is going to launch a new series called arora sisters same as kim kardeshian)

मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अरोरा सिस्टर (Arora Sisters) नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहेत. हा शो हॉलिवूडच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'कीपिंग अप विथ कार्दशियन्स'सारखाअसू शकतो असं बोललं जात आहे. 

मलायका आणि अमृता या दोघीही या शोमध्ये त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसणार आहेत. समोर आलेल्या माहितीनूसार मलायका आणि अमृताच्या बेस्ट फ्रेंड्स करीना आणि करिश्मा देखील या शोमध्ये दिसू शकतात. बॉलीवूडमध्ये या चौघींची मैत्री खूप प्रसिद्ध असून प्रत्येक पार्टीत त्या एकत्र दिसतात. मलायका आणि अमृता पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.

यापूर्वी टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती गौहर खान तिची बहीण निगार खानसोबत खान सिस्टर नावाच्या शोमध्ये दिसली होती. "फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज" या शोमध्ये देखील बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रेक्षकांसोबत शेअर करतात. 

मलायका तिच्या डान्स नंबरसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. मलायका अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे. मलायका बर्‍याच काळापासून इंडस्ट्रीचा भाग आहे, 2008 मध्ये तिची भेट अरबाज खानशी झाली आणि ते दोघे एकत्र चित्रपट निर्माते झाले. त्याच्या निर्मिती संस्थेने दबंग आणि दबंग 2 सारखे चित्रपट बनवले आहेत.