कंगनाचा बहिणीसोबत वाद, विचित्र धमकी देत म्हणाली....

कंगना आणि तिच्या बहिणीचं नातं अनेकांना हेवा वाटेल असंच होतं, पण आज असं काही झालं की...  

Updated: Sep 13, 2021, 06:29 PM IST
कंगनाचा बहिणीसोबत वाद, विचित्र धमकी देत म्हणाली.... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल ही जोडी बॉलिवूडमध्ये बऱ्या कारणांनी चर्चेत असते. कंगना तिच्या चित्रपटांमुळे आणि विविध मुद्द्यांवर केलेल्या मतप्रदर्शनामुळे जशी चर्चेत येते, अगदी त्याचप्रमाणे तिची बहीण रंगोलीसुद्धा आपल्या बहिणीच्या भूमिकांना पाठिंबा देण्यासाठी ओळखली जाते. पण, आता म्हणे कंगना तिच्याच बहिणीला अनफॉलो करण्याच्या गोष्टी करु लागली आहे. 

कंगना आणि तिच्या बहिणीच्या नात्यात नेमकी कशामुळे ठिणगी पडली, असाच विचार तुम्हीही करत असाल. पण, विचारांना जास्त चालना द्यायटची गरज नाही, कारण कंगना आणि तिच्या बहिणीमध्ये मुळात खराखुरा वाद झालेलाच नाही. 

त्याचं झालं असं की, एका मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देत असताना कंगनानं हे असं सर्वांच्याच भुवया उंचावणारं उत्तर दिलं. इन्स्टाग्रमावर अनफॉलो करायचं झाल्यास तू कोणाला अनफॉलो करशील, असा प्रश्न विचारला असता कंगनानं मोठ्या विनोदी अंदाजात आणि कोणतीही चर्चा टाळण्यासाठी म्हणून तिची बहीण रंगोली चंदेल हिचं नाव घेतलं. 

फोनवरील शेवटी संपर्क साधलेल्या व्यक्तीला पुन्हा फोन करत माझ्या आयुष्यात तुमची काही गरज नाही, असं म्हणण्याचं आव्हानही कंगनानं स्वीकारलं. इथं तो फोन नंबर तिच्या बहिणीचा म्हणजेच रंगोलीचाच होता. त्यामुळे कंगनानं असं म्हणताच काहीही झालं तरीही मी तुझ्या आयुष्यात असेनच... असं तिचं बहीण म्हणाली. बहिणीच्या या उत्तरानंतर, पाहा हिचं धाडस... असं म्हणत कंगना व्यक्त झाली. 

बॉलिवूडला अजून बरंच काही शिकायचं आहे... 
'थलैवी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या कंगनाने दाक्षिणात्य चित्रपटविश्वात काम करण्याचा अनुभव सांगताना या कलाविश्वात तिला काम करताना आपलेपणाची जाणीव झाली. बॉलिवूडला इतर चित्रपट जगतांकडून शिकण्यासारखं बरंच आहे, हेसुद्धा तिनं न विसरता सांगितलं.