'मुस्लिम समाजाकडून जीवे मारण्याची धमकी,': ब्रा फ्लॉन्ट करणाऱ्या अभिनेत्रीचे गंभीर आरोप

उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. 

Updated: Sep 13, 2021, 05:43 PM IST
 'मुस्लिम समाजाकडून जीवे मारण्याची धमकी,': ब्रा फ्लॉन्ट करणाऱ्या अभिनेत्रीचे गंभीर आरोप title=

मुंबई : उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. कधी ती तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते, तर कधी ती तिची ड्रेसिंग सेन्सने लोकांचं लक्ष वेधून घेते. उर्फी अलीकडेच बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर पडली. ती बाहेर पडताच सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी म्हणाली, ''मी खूप आश्चर्यकारक आहे. बिग बॉसने माझी ही गुणवत्ता पाहिली नसेल, पण जगाला कळलं आहे की, मी खूप मनोरंजक आहे. आता हा बिग बॉसचा तोटा आहे. मात्र माझं टॅलेंट जगातील लोकांना समजलं आहे आणि हेच माझ्यासाठी खूप आहे.''

अलीकडेच, एका मुलाखतीमध्ये बोलताना, उर्फीने सांगितलं की, ''मुस्लिम असल्यामुळे मला मुस्लिमच टार्गेट करतात, शिवीगाळ करतात, मला जीवे मारण्याची धमकी देतात आणि फतवा देखील जारी करतात. मला अनेकदा माझ्या ड्रेसबाबत बुरखा आणि हिजाब घालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याचा मला काही फरक पडत नाही. ती पुढे म्हणाली की, जर तुम्हाला फतवा काढायचा असेल तर करा, मी असेच कपडे घालणार.

याचबरोबर कमेंट करून मला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली जाते, तर तिने कोणाचंही नुकसान केलं नाही. त्याच्यासोबत मुस्लिम समाजाच्या नाराजीवर उर्फी म्हणते की, संपूर्ण समाज माझ्यावर नाराज आहे. तिला तिचा धर्म बदलायला देखील सांगितलं जातं.

उर्फी म्हणाली, ''मुस्लिम महिलांबद्दल एक प्रतिमा आहे की, त्यांनी हिजाब घातला पाहिजे. जेव्हा तेच लोकं मला बिकिनी घातलेलं पाहतात तेव्हा ते खूप अस्वस्थ होतात. संपूर्ण समाज माझ्यावर नाराज आहे. मी मुस्लिम आहे आणि मला अभिमान आहे. मी एक मुलगी आहे आणि माझ्या स्वतःच्या इच्छेनुसार जगते, म्हणून मी माझा धर्म बदलला पाहिजे का? लोक मला धर्म बदलायला सांगतात. काहीही झालं तरी मी धर्म बदलणार नाही. असो, माझा धर्मापेक्षा मानवतेवर जास्त विश्वास आहे'' असे गंभीर आरोप उर्फीने केले आहेत.

उर्फी जावेदला अलीकडेच मुंबई विमानतळावर ब्रा फ्लॉन्ट केल्याबद्दल जोरदार ट्रोल केलं गेलं. नेटिझन्सनी उर्फीच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला पब्लिसिटी स्टंट म्हटलं. त्यानंतर उर्फीने आपलं स्पष्टीकरण दिलं होतं आणि म्हटलं कि, "जर मला फक्त प्रसिद्धी हवी असती तर मी कपड्यांशिवाय विमानतळावर गेले असते." त्याचवेळी, तिने नाराजी व्यक्त केली की लोक तिच्याबद्दल बोलण्याऐवजी तिच्या कपड्यांबद्दल बोलतात. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या उर्फीने तिच्या विमानतळाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये उर्फीचे जॅकेट समोरून इतकं लहान होतं की तिची ब्रा  पूर्णपणे दिसत होती. याबाबत ट्रोलर्सनी सोशल मीडियावर तिची खिल्लीही उडवली.