रेखा- अमिताभ बच्चन यांच्या नात्याचा अनेक वर्षांनंतर उलगडा; या बड्य़ा नेत्याशी कनेक्शन

रेखा यांच्या नात्यातील अनेक गोष्टी गुढ आहेत. 

Updated: Oct 16, 2021, 12:55 PM IST
रेखा- अमिताभ बच्चन यांच्या नात्याचा अनेक वर्षांनंतर उलगडा; या बड्य़ा नेत्याशी कनेक्शन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री रेखा आणि अभिनेता अमिताभ बच्चन ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची. रुपेरी पडद्यावरील पात्र असो किंवा मग खऱ्याखुऱ्या जीवनातील त्यांचं नातं असो, चर्चा कायमच होत गेली आणि पाहता पाहता हा विषय सातत्यानं प्रकाशझोतात येत गेला. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्यातील अनेक गोष्टी गुढ आहेत. काही गोष्टींबद्दल अद्यापही खुलासा झालेला नाही. पण, सध्या मात्र या नात्यातील एक मोठा उलगडा सर्वांसमोर झाला आहे. 

अभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा या दोघीही अतिशय चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्य़ांना एकत्रही पाहिलं गेलं आहे. अमिताभ बच्चन यांच्याशीही हेमा यांची चांगली मैत्री आहे. मैत्रीच्या याच नात्याखातर हेमा मालिनी या रेखा आणि बिग बी यांची भेट घालण्यास तयार झाल्या होत्या. या साऱ्यासाठी त्यांनी एका राजकीय नेत्याची मदतही घेतल्याचं म्हटलं गेलं. 

यासिर उस्मान लिखित एका पुस्तकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात करण्य़ात आलेला दावा सांगतो की हेमा मालिनी यांनी रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं रुळावर आणण्यासाठी अमर सिंह यांची मदत घेतली होती. अमिताभ हे सिंह यांचे चांगले मित्र होते, ज्यामुळे त्यांनी या नात्यासाठी हा एक प्रयत्न केला होता. पण, पुढे नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.