Aishwarya Rai- Abhishek Bachchan यांच्यात पडलेली वादाची ठिणगी; चारचौघात असं का वागले?

Aishwarya Rai- Abhishek Bachchan : स्टार कपल म्हणून कायमच चर्चेत असणाऱ्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन जातील त्या ठिकाणी सर्वांच्याच नजरा वळवतात. पण, या जोडीमध्ये पडेलली वादाची ठिणगी पाहून चाहत्यांनाही चिंता वाटलेली.   

Updated: Apr 12, 2023, 09:33 AM IST
Aishwarya Rai- Abhishek Bachchan यांच्यात पडलेली वादाची ठिणगी; चारचौघात असं का वागले?  title=
Bollywood Actress Aishwarya Rai angry on husband Abhishek Bachchan old Video Goes Viral

Aishwarya Rai- Abhishek Bachchan : बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांकडे Power Couple म्हणून पाहिलं जातं. अर्थात त्यामागं बरीच कारणं असतात. चाहत्यांचं अमाप प्रेम मिळवणाऱ्या याच जोड्यांमध्ये काही बिनसलं की मात्र चाहत्यांचाच सर्वाधिक हिरमोड होतो, त्यांना असंख्य प्रश्नही पडतात. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मग आधार घेतला जातो इंटरनेट किंवा थेट सोशल मीडियाचा. 

मग काय? इंटरनेटवर एक शब्द टाईप केल्यानंतर समोर येणारी ढिगभर माहिती तपासत वादाच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात. साध्य काहीच होत नाही, पण उगाचच स्वत:ला मिळणारं समाधान प्रश्नांचा काहूर शमवतं. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत सध्या असंच काहीसं घडताना दिसत आहे. (Bollywood Actress Aishwarya Rai angry on husband Abhishek Bachchan old Video Goes Viral)

व्हायरल व्हिडीओमुळं एकच चर्चा... 

हिंदी कलाजगतातील लोकप्रिय जोडी असणाऱ्या अॅश आणि अभिषेकचं नाव या न त्या कारणानं चर्चेत असतं. सध्या त्यांच्या नावाच्या चर्चा सुरु आहेत एका व्हायरल व्हिडीओमुळं. या व्हायरल व्हिडीओचे काही Screenshots सध्या प्रचंड शेअर होत असून, त्यामध्ये या जोडीमध्ये काहीतरी बिनसल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. बरं, हे सर्व तिथंच असणारी नव्या नवेली नंदा म्हणजे अभिषेकची भाची पाहूनही तिची नजर वळवताना दिसतेय आणि चाहत्यांचे प्रश्न डोकं वर काढत आहेत. 

Aishwarya rolls eyes at Abhishek then snaps at Navya 
by u/asamshah in BollyBlindsNGossip

हेसुद्धा वाचा : "सेलिना एकटीच अशी अभिनेत्री जिने वडील- मुलासोबत...", अभद्र शब्दांत बरळणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

 

Reddit या प्लॅटफॉर्मवरून व्हायरल होणारा हा व्हिडीओ अभिषेकचा प्रो कबड्डी संघ, जयपूर पिंक पँथर्सच्या सामन्यादरम्यानचा असल्याचं कळत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अभिषेकला नेमकी काय बोलतेय हे लक्षात येत नाहीये. पण, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता काहीतरी बिनसलं होतं हे मात्र नक्की. पण, ते नेमकं काय हे अभिषेक- ऐश्वर्यालाच ठाऊक. सरतेशेवटी एक गोष्ट महत्त्वाची की या जोडीचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ हा बऱ्याच दिवसांपूर्वीचा असून, त्यांच्यामध्ये सध्या काहीही बिनसलं नाहीये. त्यामुळं चाहत्यांनाही चिंता करण्याची गरज नाही.