"सेलिना एकटीच अशी अभिनेत्री जिने वडील- मुलासोबत...", अभद्र शब्दांत बरळणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Celina Jaitly on Troll: सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या एका नेटकऱ्याला अभिनेत्री सेलिना जेटलीने (Celina Jaitly) सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 12, 2023, 08:53 AM IST
"सेलिना एकटीच अशी अभिनेत्री जिने वडील- मुलासोबत...", अभद्र शब्दांत बरळणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर title=

Celina Jaitly on Troll: सोशल मीडियावर (Social Media) सेलिब्रेटींना अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. अनेकदा काही नेटकरी पातळी ओलांडत सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह विधान करत गंभीर आरोपही करत असतात. अनेकदा सेलिब्रिटी अशा नेटकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात. पण काही सेलिब्रिटी मात्र त्यांना सडेतोड उत्तर देतात. नुकतंच अभिनेत्री सेलिना जेटलीने (Celina Jaitly) गंभीर आरोप करणाऱ्या अशाच एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं आहे. इतकंच नाही तर तिने थेट ट्विटरकडे (Twitter) त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

सेलिना जेटलीने ट्वीटवर आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित गंभीर आरोप करणाऱ्या एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहेत. आपण परदेशातील सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीने सेलिन जेटली अभिनेता फरदीन खान आणि त्याचे वडील फिरोज खान यांच्यासह शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. यावर सेलिना जेटलीने त्याला सडेतोड उत्तर दिलं. 

"सेलिना जेटली एकमेव अभिनेत्री आहे, जी वडील फिरोज खान आणि मुलगा फरदीन खान यांच्यासह अनेक वेळा झोपली आहे," असा गंभीर आरोप एका नेटकऱ्याने केला होता. यावर व्यक्त होताना सेलिना जेटलीने त्याला उत्तर दिलं की, "प्रिय मिस्टर संधू, आशा आहे की हे पोस्ट केल्याने तुम्हाला पुरुष बनण्यासाठी आवश्यक परिघ आणि लांबी मिळाली असेल. तसंच आशा आहे की, तुम्हाला तुमच्या इरेक्टाइल डिसफंक्शनपासून बरे करतील. तुमच्या समस्येचे निराकरण करण्याचे इतर मार्ग आहेत..जसे की डॉक्टरांकडे जाणे, तुम्ही ते कधीतरी करून पहावे". दरम्यान सेलिनाने @TwitterSafety ला टॅग करत कृपया कारवाई करा अशी मागणीही केली आहे. 

सेलिना जेटलीने जानशीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून फिरोज खान यांनी आपला मुलगा फरदीन खानला बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर सेलिना टॉम डिक अॅण्ड हॅरी, अपना सपना मनी मनी, नो एंट्री आणि गोलमाल रिटर्न्स अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. 2020 मध्ये सीझन्स ग्रीटिंग चित्रपटातून तिने कमबॅक केलं होतं.