पहिल्यांदाच समोर आला Sunny- Bobby Deol च्या सख्ख्या बहिणींचा फोटो

तू माझ्यासाठी माझं सारं जग आहेस....

Updated: Oct 20, 2021, 02:02 PM IST
पहिल्यांदाच समोर आला Sunny- Bobby Deol च्या सख्ख्या बहिणींचा फोटो title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नुकताच अभिनेता सनी देओलचा वाढदिवस पार पडला. यानिमित्तानं सर्वांनीच अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  चाहत्यांसोबतच सेलिब्रिटी वर्तुळातूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण, या साऱ्यामध्ये खास शुभेच्छा होत्या त्या म्हणजे सनीच्या बहिणींच्या. खुद्द बॉबी देओलनंच बहिणींसोबत भावाला शुभेच्छा देतानाचा फोटो शेअर केला आहे. 

'गदर' चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाल्यानंतर चर्चेत आलेल्या सनी देओल यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 19 ऑक्टोबरला सनी देओलनं 65 वा वाढदिवस साजरा केला. पण, वाढत्या वयाची एकही सुरकुती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. आपल्या अशा या सुदृढ आणि चिरतरुण भावाला शुभेच्छा देत तू माझ्यासाठी माझं सारं जग आहेस, अशा शब्दात बॉबी देओलनं भावना व्यक्त केल्या. त्याच्या या पोस्टमध्ये बॉ़बी आणि सनी त्यांच्या बहिणींना मिठी मारताना दिसत आहेत. या फोटोच्या निमित्तानं देओल बंधुंच्या या बहिणी सर्वांसमोर आल्या आहेत. 

सनी देओलबाबत सांगावं, तर त्याचं खरं नाव अजय सिंह देओल असं आहे. 1984 मध्ये त्यानं 'बेताब' या चित्रपटातून बॉलिवूडमध्य़े पदार्पण केलं होतं. यानंतर 'डकैत', 'यतीम', 'त्रिदेव', 'चालबाज', 'घातक' आणि 'गदर' अशा सुपरहिट चित्रपटांतून झळकला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)