Video : आईसाठी सनी देओलनं जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सनी काय करतोय पाहा...   

Updated: Aug 31, 2021, 03:42 PM IST
Video : आईसाठी सनी देओलनं जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाच्या आणि पिळदार शरीरयष्टीच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा सनी देओल हा अभिनेता म्हणजे वाढत्या वयाचं सावटही नसणारा अभिनेता. 

वयाचा आकडा कुठंही कशाच्याही आड येऊ न देता सनीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. एक अभिनेता असण्यासोबतच तो एक पिता, पती आणि मुलगा म्हणूनही त्याच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी चोखपणे निभावत असतो. त्यामुळं तोच खऱ्या अर्थानं सुपरमॅन आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

सध्या सोशल मीडियावर सनी त्याच्या कोणत्या आगामी प्रोजेक्टमुळे नव्हे, तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो आईच्या नकळतच तिची मदत करताना दिसत आहे. विरल भयानी / बॉ़लिवूडबाप या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सनीचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

गाणं गात दिली ग्वाही; कोणासोबत रंगतेय कंगनाची केमिस्ट्री; पाहा व्हिडीओ

 

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सनी विमानतळावर आईची लोळणारी ओढणी सांभाळताना दिसत आहे. आईच्या लक्षातही आलेलं नसताना तिचा हा लेक मदतीसाठी पुढे येताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आईसाठी सनीची ही काळजी आणि तिच्यावर असणारं प्रेम पाहून फॉलोअर्स आणि चाहत्यांनाही भावना दाटून आल्याचं दिसत आहे. माय- लेकाच्या या जोडीसाठी हा व्हिडीओ अनेकांनीच लाईक केला असून, त्याला मिळालेल्या व्ह्यूजची संख्याही जास्त आहे. 

येत्या काळात सनी आर. बाल्की यांच्या एका थरारपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात पूजा धन्वंतरी आणि पूजा भटट्ही त्याच्यासोबत झळकणार आहेत. सनी देओलच्या या आगामी प्रोजेक्टबद्दलही बॉलिवूडमधून कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे.