''बाप हा बापच असतो...'' साऊथ सुपरस्टार महेश बाबुला सुनील शेट्टीचं कडाडून उत्तर

अलीकडेच साऊथ विरुद्ध बॉलिवूड असा वाद समोर येत आहे. खरंतर साऊथ अभिनेता महेश बाबु याच्या वक्तव्यानंतर हा वाद पेटला.

Updated: May 13, 2022, 08:09 AM IST
''बाप हा बापच असतो...'' साऊथ सुपरस्टार महेश बाबुला सुनील शेट्टीचं कडाडून उत्तर title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने अनेक हीट चित्रपट दिली आहे. कॉमेडीपासून ते रोमान्स आणि अगदी एक्शन चित्रपट सुनील शेट्टीने केलं आहेत. त्याकाळी सुनील शेट्टी हे नाव नामांकित अभिनेत्यांमध्ये येत होतं आणि अजूनही आहेच. सध्या सुनील शेट्टी बॉलिवूडमध्ये सक्रीय नसला तरी त्याच्या चाहत्यांची कमी नाही. इतकी वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर त्याच्याप्रती अभिनेत्याला अभिमान असणं सहाजिकच आहे. म्हणूनच या बॉलिवूडमधील साऊथ इंडियन अभिनेत्याने, साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्याला सुनावलं.

अलीकडेच साऊथ विरुद्ध बॉलिवूड असा वाद समोर येत आहे. खरंतर साऊथ अभिनेता महेश बाबु याच्या वक्तव्यानंतर हा वाद पेटला, ज्यावर बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याने कडाडून उत्तर दिलं आहे.

वास्तविक महेश बाबूने आपल्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगितले होते की, 'मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, बॉलिवूडला मी परवडणार नाही.' ज्यानंतर सर्वत्र खळबळ सुरु झाली.

यापूर्वी दाक्षिणात्य कलाकार कीचा सुदीप आणि अजय देवगण यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद झाले आहेत. इतकंच नाही तर राम गोपाल वर्मा, सोनू सूद आणि सोनू निगमसह अनेक सेलिब्रिटींनी या वादावर आपलं मत मांडलं आहे.

अलीकडे, काही दक्षिणेचे चित्रपट देशात आणि जगात हिट झाल्यानंतर, दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूडबद्दल वक्तृत्व करणं सुरू केलं आहे आणि स्वत:ला चांगले आणि उत्तम ठरवण्यासाठी ते जराही मागे-पुढे पाहात नाहीत.

त्यामुळे जेव्हा बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या वादाबद्दल सुनील शेट्टीला प्रश्न विचारला गेला असता, त्याला उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, ''बाप नेहमीच बाप असतो.''

खरं तर, अलीकडेच, आगामी चित्रपट "मेजर" च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान, साऊथ सुपरस्टार महेश बाबूला त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्याने म्हटले की, बॉलीवूडला मी परवडणार नाही. हा मुद्दा आता तापत आहे. यावर सर्वच सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सुनील शेट्टी एका मुलाखतीदरम्यान म्हणाला, " कहीही बोला, पण हे लक्षात ठेवा की बाप हा बाप असतो मला वाटतं, सोशल मीडियावर बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्रीचा देखावा तयार झाला आहे. आपण भारतीय आहोत आणि जर आपण OTT प्लॅटफॉर्मवर पाहिलं तर भाषेमुळे काही फरक पडत नाही, कन्टेन्ट महत्त्वाचा आहे. मी देखील दक्षिणेतून आलो आहे, पण माझी कर्मभूमी मुंबई आहे. मला मुंबईकर म्हणणे पसंत आहे."

पुढे सुनील शेट्टी म्हणाला "कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये हा निर्णय प्रेक्षक घेत आहेत. आमची अडचण अशी आहे की, आम्ही प्रेक्षकांना विसरलो आहोत. सिनेमा असो वा ओटीटी, बाप हा बापच राहणार, कुटुंबातील बाकीचे सदस्य कुटुंबातीलच राहणार. बॉलीवूड नेहमीच बॉलीवूड राहील. आपण विचार केला पाहिजे, कारण आजच्या काळात आशय हाच राजा आहे हे खरे आहे."