'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनच्या फीची रक्कम ऐकून, बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वांनाच बसलाय धक्का

पुष्पा 2 चे शूटिंग देखील लवकरच सुरु होणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार, असल्याचे मानले जात आहे.

Updated: May 12, 2022, 10:55 PM IST
'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनच्या फीची रक्कम ऐकून, बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वांनाच बसलाय धक्का title=

मुंबई : पुष्पा चित्रपटाने देशभरात भरपूर कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला असला तरी हा चित्रपट अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील गाणी अजूनही लोकांच्या तोंडावर आहेत. तसेच चित्रपटातील डायलॉगचं क्रेज अजूनही लोकांच्या मनातून गेलेलं नाही. खरंतर हा चित्रपट अल्लूच्या स्टाईलमुळे सुपर हीट ठरला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रतीक्षाही संपली आहे.

पुष्पा 2 चे शूटिंग देखील लवकरच सुरु होणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार, असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलसोबतच अल्लू अर्जुनच्या मानधनाने सगळ्यांच्या भुवया उंचावला आहे. ज्यामुळे अल्लू अर्जुन पुन्हा एकदा चर्टेचा विषय ठरला आहे.

लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे. तर दुसरीकडे, चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या भागाचे बजेट 200 कोटी होते, तर आता सिक्वेलचं म्हणजेच, पुष्पा 2 चित्रपटाचे बजेट 400 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर हा चित्रपट पूर्वीपेक्षा जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी बनवला जात आहे.

दुसरीकडे, अल्लू अर्जुनच्या मानधनाबद्दल बोलायचे झाले तर, अल्लू अर्जुनने सिक्वेलसाठी 100 कोटी रुपये मानधन देण्यात येणार आहे. ज्यामुळे सर्वत्र तो हा विषय चर्चेत आला आहे.

अल्लू अर्जूनच्या या मानधनाबद्दल सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. परंतु याबद्दल ऑफिशीयल काहीही सांगण्यात आलेलं नाही. सध्या अल्लू अर्जुनची फी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जर अल्लूने हे मानधन खरंच सीकारलं असेल, तो आतापर्यंत सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या स्टार्सपैकी एक असेल.