शाहरुखच्या 'या' कृतीने पुन्हा सिद्ध होतंय की तोच आहे खरा 'किंग'

कित्येकांना याचा हेवाही वाटला

Updated: Dec 10, 2019, 02:30 PM IST
शाहरुखच्या 'या' कृतीने पुन्हा सिद्ध होतंय की तोच आहे खरा 'किंग' title=
शाहरुख खान

मुंबई : Gentleman, एक परिपूर्ण पुरुष म्हणजे नेमकं काय, त्याची परिभाषा काय किंवा याबाबतचं एखादं उदाहरण विचारलं असता काही नावं उत्स्फूर्तपे समोर येतात. याच नावांपैकी एक म्हणजे अभिनेता शाहरुख खान  Shah Rukh Khan . बॉलिवूडमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शाहरुखने त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच. सोबतच त्याने याव्यतिरिक्त, त्याच्या प्रत्येक कृतीतूनही चाहत्यांपुढे अनेकदा आदर्श प्रस्थापित केला आहे. सध्याही बी- टाऊनचा हा किंग त्याच्या एका कृतीतून अनेकांचीच मनं जिंकत आहे, ज्याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबईत पार पडलेल्या 'द वोग नायका फॅशन अवॉर्ड्स' The Vogue X Nykaa Fashion Awards या कार्यक्रमानिमित्त किंग खान हा त्याची पत्नी गौरी खान हिच्यासोबत हजर राहिला होता. यावेळी गौरी आणि शाहरुख यांचं एकत्र येणं आणि तेथे वावरणं अनेकांचं लक्ष वेधून गेलं. त्यांचा कित्येकांना हेवाही वाटला. अशा या सेलिब्रिटी जोडीने आणखी एका कारणाने अनेकांची मनं जिंकली. गौरीने या कार्यक्रमासाठी काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. या पायघोळ गाऊनचा मागचा भाग लांबलचक असल्यामुळे तो इतरांच्या पायाखाली येण्याची शक्यता होती. 

शाहरुखच्या ही बाब लक्षात येताच त्याने पुढे येत लगेचच गौरीच्या गाऊनचा लोळणारा भाग हातात उचलून अगदी काळजीपूर्वक तो रेड कार्पेटवर ठेवला. त्याची ही कृती पाहताना तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळतपे एक सुरेख स्मितहास्य खुललं. जणू त्याच्या ती शाहरुखच्या या कृतीला दिलेली दादच होती. 

अशा पद्धतीने शाहरुखने उपस्थितांचं मन जिंकण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीही विविध प्रसंगी, कार्यक्रमांमध्ये महिला साथीदार, पत्नी, मुलगी, मैत्रीणी किंवा एकंदरच महिलांप्रती शाहरुख कायमच आदराने वागताना दिसला. एक कलाकार म्हणून आपल्या कृतींतून तो कायमच नकळत अनेकांना महत्त्वाची शिकवण देऊन जातो.