ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अर्जून रामपालची NCB करणार चौकशी

NCB च्या रडावर अनेक बॉलिवूड कलाकार

Updated: Nov 11, 2020, 10:42 AM IST
ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अर्जून रामपालची NCB करणार चौकशी  title=

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) दोन दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) च्या मुंबईत घरावर छापा मारला. ड्रग्स कनेक्शन प्रकरणात छापा मारण्यात आला. या प्रकरणात अर्जुनची लिवइन गर्लफ्रेंड गॅब्रिएला देमित्रियाद (Gabriella Demetriade)ची NCB चौकशी करणार आहे. 

तसेच १२ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. गॅब्रिएला देमित्रियादसोबतच आज दीपिका पदुकोणची एक्स मॅनेजर करिश्माची देखील चौकशी होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपालच्या घरातून बॅन औषधांचा साठा सापडला आहे जो NDPS ऍक्ट अंतर्गत येतात. याबाबत त्याच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी होणार आहे. 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीच्या रडारवर अनेक कलाकार असल्याचं समोर येत आहे. NCB