Animal मध्ये खरंच नरभक्षक आहे बॉबी देओल? भूमिकेविषयी म्हणाला, 'टीझरमध्ये मी..

Bobby Deol in Animal : बॉबी देओल अॅनिमलच्या टीझरमध्ये फक्त काही सेकंदासाठी दिसला मात्र, त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नक्की बॉबी देओलनं त्यावेळी काय केलं याचा खुलासा नाही मात्र, त्यानं थोडक्यात हिंट दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 16, 2023, 04:56 PM IST
Animal मध्ये खरंच नरभक्षक आहे बॉबी देओल? भूमिकेविषयी म्हणाला, 'टीझरमध्ये मी.. title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol in Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांचं लक्ष वेधले होते. या चित्रपटात काही वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. पण चित्रपटाच्या अखेरीस असलेल्या अभिनेता बॉबी देओलच्या एका सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले. या सीनमध्ये बॉबी देओलनं मिस्ट्री क्रिएट केली आहे. त्याचा स्क्रिन प्रेझेंस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच कारण म्हणजे कधीच न पाहिलेला बॉबी देओलचा हा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. या टीझरमध्ये बॉबीच्या गळ्यात हार आणि हातात वस्तरा पाहायला मिळत आहे. या सीनमध्ये बॉबीनं काही खाल्लं की काय? असा प्रश्न उपस्थित राहिला होता. दरम्यान, एका कार्यक्रमात बॉबीनं या सीनविषयी सांगितलं आहे. बॉबीनं यावेळी सांगितलं की टीझरमध्ये स्वत: ला पाहून तो स्वत: देखील खूप घाबरला होता. 

बॉबी देओलनं जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या या सीनविषी खुलासा केला आहे. बॉबी म्हणाला की 'मी खूप भाग्यवान आहे, कारण मला अॅनिमल या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाली. मला संदीपचं काम खूप आवडलं. तो असा एकमेव दिग्दर्शक आहे, ज्यानं एकच चित्रपट दोनवेळा बनवला आणि दोनही वेळा हिट झाला. मला वेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत आणि जसं मी आधी सांगितलं की माझी एक इमेज झाली आहे ती मला मोडून काढायची आहे. एक अभिनेता म्हणून माझी ही इच्छा आहे की मला चॅलेन्ज मिळायला हवे आणि मी काहीतरी वेगळं करायला हवे.'

टीझरमधील शेवटच्या सीनबद्दल बॉबी म्हणाला...

टीझरमधील शेनटच्या सीनविषयी बॉबी म्हणाला, 'जेव्हा हा सीन शॉट झाला तेव्हा मी मॉनिटरवर पाहिला नव्हता. त्यावेळी आम्हाला हा सीन पटकण करायचा होता. जेव्हा मी पहिल्यांदा शॉट पाहिला तेव्हा वाटलं, खरंच हा मी आहे? या शॉटवर जी प्रतिक्रिया मिळाली, त्यावरून मला खूप आनंद मिळाला. यावरून एक गोष्ट समोर आली की प्रेक्षकांना मला काही तरी वेगळं करताना पाहायचं आहे. त्यांना जाणून घ्यायचं आहे की शॉटमध्ये काय सुरु होतं. मी तुम्हाला हे सांगू शकत नाही, पण मी त्यावेळी काही तरी खातोय.' 

हेही वाचा : कमाईसाठी इतरांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या राज कुंद्राचाच Video Leak!

या शेवटच्या सीनमध्ये रणबीर काही खाताना दिसतोय. त्याच्या हातात वस्तरा असून तो कोणाला तरी इशारा करत आत बोलावतो आणि त्यानंतर कोणाचा तरी गळा कापल्याचा आवाज येतो. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी वेगवेगळी तर्कवितर्क लावली आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की शक्यता अशी आहे की बॉबी हा नरभक्षक असू शकतो, तो माणसांचं मांस खात आहे. पण या सगळ्या प्रेक्षकांच्या कल्पना आहेत. नक्की बॉबी काय खातोय आणि असा आवाज कशामुळे आला हे अजून त्यानं किंवा त्याच्या टीमकडून सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उस्तुकता आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.