फक्त ३ हिट सिनेमे देऊनही बॉबी देओल आहे 'इतक्या' कोटींचा मालक!

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलकडे सुमारे ४ वर्ष काहीही काम नव्हते. 

Updated: Jul 25, 2018, 12:57 PM IST
फक्त ३ हिट सिनेमे देऊनही बॉबी देओल आहे 'इतक्या' कोटींचा मालक! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलकडे सुमारे ४ वर्ष काहीही काम नव्हते. मात्र आता त्याने पुन्हा एकदा कामाला जोरदार सुरुवात केली आहे आणि आता ते तो गमावू इच्छित नाही. बॉबी देओल सध्या आगामी सिनेमा हाऊसफुल 4 चे शूटिंग करत आहे. सलमानच्या रेस 3 मधून बॉबीने दमदार कमबॅक केले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल केली नसली तरी त्यातील बॉबीचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

बॉबीकडे आहेत हे सिनेमे

आता बॉबीकडे 'हाऊसफुल 4' शिवाय 'यमला पलगा दिवाना फिर से' आणि सलमानचा 'भारत' असे दोन सिनेमे आहेत. भारत सिनेमात देखील बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमात परतल्यानंतर बॉबी देओल पुन्हा एकदा आपल्या बॉडीकडे विशेष लक्ष देत आहे.

तर सर्वात बेस्ट बॉडी माझी असती..

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला की, २० वर्षांचा असताना फिटनेसकडे विशेष लक्ष दिले असते तर आता बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये सर्वात बेस्ट बॉडी माझी असती. बॉबी देओलने २६ वर्षांचा असताना बरसात सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. या सिनेमासाठी त्याला फिल्म फेयर बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार मिळाला. २३ वर्षांच्या करिअरमध्ये बॉबीचे फक्त ३ सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले.

इतक्या कोटींचा मालक

यामध्ये १९९७ मध्ये आलेला गुप्त, १९९८ मध्ये आलेला सोल्जर आणि २००२ मध्ये आलेला हमराज या सिनेमांचा समावेश आहे. १९९८ पासून सुमारे ५ वर्ष त्याने ७ सिनेमे केले. पण सारे फ्लॉप ठरले. २००२ नंतर तर कोणताही हिट सिनेमा बॉबीने दिला नाही आणि त्यानंतर मात्र त्याला काम मिळणेच बंद झाले. पण याचा अर्थ असा नाही की बॉबी कंगाल झाला. बॉबी आज देखील २०५ कोटी संपत्तीचा मालक आहे. बॉबीकडे ३ लग्जरी कार्स आहेत ज्यांची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे.

सिनेमांशिवाय करतो हे काम

सिनेमांशिवाय बॉबीचे एक हाय क्लास रेस्टॉरंट आहे. मुंबईत त्याचे दोन चायनीज रेस्टॉरंट आहेत. एकाचे नाव Someplace Else असून २००६ पासून बॉबी ते चालवत आहे. तर दुसऱ्याचे नाव सुहाना आहे.
तसंच काही दिवसांपूर्वी बॉबीने डिजे चे काम सुरु केले होते. पण ते काम फार काळ चालू शकले नाही. मुंबईतील जुहूमध्ये बॉबीचे ८ कोटींचे घर आहे. त्याशिवाय पंजाबमध्ये एक फार्महाऊस आहे.